ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होणार आणखी 3 नवीन स्मार्टफोन ! Vivo , Samsung , Realme करणार धमाका

Published on -

Upcoming Smartphone : तुम्हालाही नवा फोन खरेदी करायचा आहे का ? मग ऑक्टोबरचा महिना तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. खरंतर, अनेकजण येत्या दिवाळीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान अशाच लोकांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. तीन दिग्गज स्मार्टफोन उत्पादक कंपन्या या महिन्यात 3 नवीन हँडसेट लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

अशा स्थितीत आता आपण ऑक्टोबर महिन्यात कोणते तीन स्मार्टफोन लॉन्च होणार ? कोणत्या तारखेला लॉन्च होणार ? त्यांचे स्पेसिफिकेशन व फीचर्स अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहितीविषयी सविस्तर.

ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार 3 नवीन स्मार्टफोन

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G – येत्या काही दिवसांनी कंपनी हा बजेट स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी गॅलेक्सी एम 17 भारतात लॉन्च होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 14 हजार रुपये असू शकते. हा स्मार्टफोन सॅमसंगच्या एक्झिनोस 1330 प्रोसेसरमध्ये आणला जाईल.

हा मोबाईल 4 जीबी, 6 जीबी तसेच 8 जीबी रॅमसह ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. फोटोग्राफीसाठी त्याला 50 एमपी ट्रिपल रियर कॅमेरा व 13 एमपी सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याच वेळी यात 5000 एमएएच बॅटरी दिली जाईल. नक्कीच ज्यांचे बजेट 15000 रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी हा सॅमसंगचा नवा फाईव्ह जी फोन बेस्ट राहणार आहे.

Realme 15 Pro – रिअलमीच्या 15 प्रो चे Game of Thrones Edition सुद्धा ऑक्टोबर मध्येच लॉन्च होणार आहे. हा फोन 8 ऑक्टोबरला लॉन्च करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. याच्या 12 जीबी Ram + 512 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत साधारणता 45 हजार रुपयांच्या आसपास राहू शकते.

महत्वाची बाब म्हणजे या स्मार्टफोन मध्ये 7000 mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. नक्कीच जर तुम्हाला चांगला बॅटरी बॅकअप वाला फोन घ्यायचा असेल तर रिअलमीचा हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट राहील.

Vivo V60e 5G – हा कंपनीचा बहुचर्चित स्मार्टफोन 7 ऑक्टोबरला लॉन्च होणार आहे. हा विवोचा 200 मेगापिक्सल मेन कॅमेरा असणारा पहिला फोन असेल यात 85 मिमी टेलिफोटो पोर्ट्रेट लेन्स व 50 एमपी सेल्फी कॅमेरा असेल.

या स्मार्टफोनमध्ये डायमेंसिटी 7300 चिपसेटचे स्ट्रॉंग प्रोसेसर दिले जाणार आहे. याला 6500 mAh बॅटरी दिली जाईल. पण अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जेव्हा हा स्मार्टफोन लॉन्च होईल तेव्हाच किमती बाबत योग्य ती माहिती सांगितली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News