‘या’ तारखेला लाँच होणार Honor Magic 8 सीरीज स्मार्टफोन ! 200 MP कॅमेरासह मिळणार हे फिचर्स

Published on -

Upcoming Smartphone : येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा होईल. या शुभ मुहूर्तावर अनेकजण नवीन मोबाईल खरेदी करणार आहेत. आता तुमचा पण असाच प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

Honor कंपनी Magic 8 सीरिज 15 सप्टेंबरला लॉन्च करणार आहे. सुरुवातीला ही सिरीज चायना मध्ये लॉन्च होईल. कंपनी एका इव्हेंटमध्ये ऑनर मॅजिक 8 आणि ऑनर मॅजिक 8 प्रो फोनसह इतर प्रॉडक्ट देखील लाँच करणार आहेत.

या मेगा इव्हेंट मध्ये कंपनीकडून मॅजिकपॅड 3, मॅजिकपॅड 3 प्रो, मॅजिक वॉच 5 प्रो, इअरबड्स 4 लाँच करणार आहे. आता आपण कंपनीचा ही अपकमिंग सीरिज कशी राहणार, यामध्ये काय फीचर्स मिळणार याची माहिती पाहुयात.  

Honor चे हे अपकमिंग स्मार्टफोन मॅजिकओएस 10 वर काम करतील. ते नवीनतम अँड्रॉइड 16 वर आधारित असतील. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात प्रगत सॉफ्टवेअर तंत्रज्ञान प्रणाली राहणार आहे. या हँडसेटचे परफॉर्मन्स, Privacy आणि एआय फीचर्स अधिक प्रगत राहतील.

ऑनर मॅजिक 8 प्रो मध्ये 6.7 इंचाचा मायक्रो-क्वाड कर्व्हड ओएलईडी डिस्प्ले राहील. याला 7200 एमएएचची मोठी बॅटरी राहणार आहे. या फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा असेल.

या हँडसेटमध्ये 50 एमपी प्रायमरी कॅमेरा, 50 एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स व 200 एमपी पेरिस्कोप टेलिफोटो सेन्सर राहणार आहे. सेल्फी तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 एमपी लेन्स देखील दिला जाणार आहे. हा हँडसेट रायझिंग सन गोल्ड, अझ्युर, स्नो व्हाइट, वेल्वेट ब्लॅक रंगात उपलब्ध असेल.

या सीरिजच्या दुसऱ्या मॉडेलमध्ये 6.58 इंचाचा फ्लॅट डिस्प्ले, 7000 एमएएच बॅटरी असेल. यातील कॅमेरा सेटअप प्रो मॉडेलसारखा राहील. याचा अर्थ असा की यात 50 एमपी प्रायमरी, 50 एमपी अल्ट्रा-वाइड आणि 200 एमपी टेलिफोटो लेन्स देखील असू शकतात. हा अपकमिंग हँडसेट ब्लॅक, व्हाईट, लाईट ब्लू, गोल्ड कलर ऑप्शनमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe