Vi Recharge Plan : देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी Vodafone Idea आपल्या ग्राहकांसाठी पोस्टपेड तसेच प्रीपेड प्लॅन सादर करत असते. या प्लॅनची किंमत ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारी असते. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या जास्त आहे.
ही कंपनी बाजारातील इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देते. कंपनीचा असाच एक प्लॅन आहे जो फॅमिलीसाठी कंपनीने आणला आहे. एका रिचार्जमध्ये दोन नंबरवर मोफत कॉलिंग, डेटा आणि OTT सेवांचा आनंद तुम्हाला घेता येईल.

देशातील सर्वात मोठ्या दूरसंचार सेवा प्रदात्यांपैकी एक असणाऱ्या Vi द्वारे अनेक पोस्टपेड प्लॅन ऑफर करण्यात येत असले तरी, त्याचा 601 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन सर्वोत्तम आहे. समजा तुम्हाला दोन वापरकर्त्यांसाठी समान प्लॅन हवा असेल तर तुम्हाला तो रिचार्ज करता येईल. जरी कंपनीने आपली 5G सेवा भारतात लॉन्च केली नसली तरी सध्याच्या पोस्टपेड वापरकर्त्यांना चांगला डेटा, कॉलिंग तसेच उत्तम इंटरनेट सेवा मिळत आहेत.
Vi पोस्टपेड प्लॅन
Vodafone Idea च्या या पोस्टपेड रिचार्ज प्लॅनमध्ये, सेवा एका प्राथमिक क्रमांकावर तर दुसऱ्या दुय्यम कनेक्शनवर उपलब्ध आहेत. प्राथमिक क्रमांकावर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, एकूण 3000 एसएमएस आणि 70GB डेटा मिळत आहे. यात Binge All Night चा लाभ उपलब्ध असून रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत वापरकर्त्यांना अनलिमिटेड डेटाचा लाभ मिळतो. तसेच FUP म्हणजेच फेअर यूज पॉलिस) डेटावर याचा कोणताही परिणाम होत नाही.
मोफत मिळेल OTT सेवांचे सबस्क्रिप्शन
कंपनीच्या या प्लॅनमध्ये 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, याचाच असा अर्थी की महिन्याच्या शेवटी उरलेला डेटा पुढील महिन्याच्या मर्यादेत जोडण्यात येतो. त्याशिवाय ग्राहक 10GB डेटा शेअर करू शकतात.
इतकेच नाही तर या पोस्टपेड प्लॅनमध्ये Vi Movies & TV, Vi app मध्ये Hungama Music, Vi Games, तसेच 6 महिन्यांसाठी Amazon Prime, वर्षभर Disney+ Hotstar Mobile, SonyLIV Mobile तसेच SunNXT Premium का सब्सक्रिप्शन तुम्हाला मिळेल.
मिळतील हे फायदे
हे लक्षात घ्या की रिचार्ज प्लॅनशी जोडलेल्या दुय्यम कनेक्शनमध्ये, कुटुंबातील इतर सदस्यांना सर्व नंबरवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, एका महिन्यासाठी 3000 एसएमएस आणि शेअर करण्यासाठी 10GB डेटा शिवाय 40GB डेटा मिळेल.
हे कनेक्शन असणाऱ्या वापरकर्त्यांना 200GB पर्यंत डेटा रोलओव्हरचा लाभ देखील मिळेल. समजा तुम्हाला दोनपेक्षा जास्त कनेक्शन हवे असेल, तर कंपनी 1001 रुपये आणि रु. 1151 चे फॅमिली पोस्टपेड प्लॅन ऑफर करत आहे, जे अनुक्रमे 4 आणि 5 कनेक्शन देतात.