Vi Recharge Plan : अप्रतिम प्लॅन! 400 रुपयांपेक्षा स्वस्तात मिळवा प्रतिदिन 2.5GB डेटासह डिस्ने हॉटस्टार फ्री

Vi Recharge Plan

Vi Recharge Plan : वोडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. कंपनीकडे पोस्टपेड तसेच प्रीपेड असे दोन्ही रिचार्ज प्लॅन्स आहेत. या प्लॅनमध्ये कंपनी अनेक फायदे देत असते.

असाच एक प्लॅन कंपनीने आणला आहे ज्याची किंमत 400 रुपयांपेक्षा खूप कमी आहे. यामध्ये ग्राहकांना कमी किमतीत 2.5GB डेटा प्रतिदिन, डिस्ने हॉटस्टार तीन महिन्यांसाठी मोफत मिळत आहे. तसेच इतर फायदेदेखील यात मिळतात.

वोडाफोन-आयडियाचा 399 रुपयांचा प्लॅन

तसेच कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळत आहेत. यात Binge All Night चा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटाचा लाभ घेता येईल. या प्लॅनमध्ये डेटा डिलाइट्स देखील देण्यात येत आहेत, जे वापरकर्त्याला कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रत्येक महिन्याला 2GB पर्यंत बॅकअप डेटा देते. त्याशिवाय आता तुम्ही 121249 डायल करून किंवा Vi अॅपद्वारे डेटा डिलाइट्स लाभाचा दावा करू शकता. यामध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi चित्रपट ऍप्स मोफत वापरता येईल.

जिओचा 349 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येत असून या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2.5 जीबी डेटा देत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पात्र वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळत आहे. तसेच हा प्लॅन देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करतो. या प्लॅनमध्ये कंपनी वापरकर्त्यांना दररोज 100 मोफत एसएमएस देत आहे. त्याशिवाय या प्लॅनमध्ये उपलब्ध असणारे अतिरिक्त फायदे Jio TV, Jio Cinema आणि Jio Clouds चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहेत.

एअरटेलचा 999 रुपयांचा प्लॅन

एअरटेल आपल्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटा देत असून हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो.तसेच 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये राहणाऱ्या युजर्सना या प्लॅनचा अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळत असून या प्लॅनमध्ये तुम्हाला Airtel Xstream Play द्वारे 15 पेक्षा जास्त OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe