VIP मोबाईल नंबर कसा काढायचा ? जिओ, एअरटेल, Vi ची ऑनलाईन प्रोसेस कशी आहे?

Published on -

VIP Mobile Number : अलीकडे सर्वजण स्मार्टफोन वापरतात. आजच्या या डिजिटल युगात मोबाईल चे महत्व वाढले आहे. आता प्रत्येकाकडेच मोबाईल आहेत. मोबाईलचे महत्त्व आता फक्त बोलण्यापुरते राहिलेले नाही तर स्मार्टफोन आता आपली ओळख बनत चालली आहे.

दरम्यान आज आम्ही स्मार्टफोन धारकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण व्हीआयपी मोबाईल नंबर कसा काढायचा याबाबत माहिती पाहणार आहोत.

खरतर अनेकांना आपली वेगळी ओळख दाखवण्यासाठी व्हीआयपी नंबर हवा असतो. काही जण बिझनेस साठी व्हीआयपी नंबर घेतात.

पण व्हीआयपी नंबर काढण्याची प्रोसेस नेमकी कशी असते याबाबत अनेकांना माहिती नाही. खरे तर भारतातील प्रत्येकच टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना व्हीआयपी मोबाईल नंबर निवडण्याची संधी उपलब्ध करून देते. 

Jio चा व्हीआयपी मोबाईल नंबर कसा मिळवायचा?

 जिओ आपल्या ग्राहकांसाठी व्हीआयपी मोबाईल नंबर निवडण्याची संधी उपलब्ध करून देते. यासाठी ग्राहकांना जिओच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागते.

तुम्हालाही जिओ कडून व्हीआयपी मोबाईल नंबर घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर केल्यानंतर तुमचा जुना मोबाईल नंबर पडताळून उपलब्ध व्हीआयपी नंबर्स मधून एक सिलेक्ट करू शकता.

Vi चा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा?

 या टेलिफोन कंपनीकडून व्हीआयपी नंबर मिळवायचा असेल तर तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Vip नंबर विभागात जावे लागणार आहे.

येथून तुम्ही तुमच्या आवडीचा व्हीआयपी नंबर निवडू शकता. यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतील. पेमेंट केल्यानंतर सिम घरपोच तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल. 

Airtel चा नंबर कसा मिळवायचा?

अधिकृत वेबसाईटवर किंवा एप्लीकेशन वर तुम्हाला एअरटेल चा व्हीआयपी नंबर मिळत नाही. यासाठी तुम्हाला जवळच्या एअरटेल स्टोअर ला भेट द्यावी लागणार आहे. येथे तुम्ही तुमच्या आवडीचा व्हीआयपी नंबर घेऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe