ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ! 100x झूम आणि 50 MP कॅमेरा असणारा ‘हा’ विवोचा स्मार्टफोन 10,000 रुपये स्वस्तात मिळणार 

Published on -

Vivo Smartphone : नवरात्र उत्सव तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन शॉपिंग साइटवर सध्या सेल सुरु आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक प्रॉडक्ट स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तू या सेलमध्ये ग्राहकांना कमी किमतीत उपलब्ध होत आहेत.

अशा स्थितीत जर तुम्हाला नवा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. अमेझॉन वर सुरू असणाऱ्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये विवो चा एक जबरदस्त कॅमेरा असणारा स्मार्टफोन दहा हजार रुपयांनी कमी किमतीत खरेदी करण्याचे सुवर्णसंधी उपलब्ध झालीये. Vivo X200 FE 5G या विवोच्या स्मार्टफोनवर ही ऑफर सुरू आहे.

विवो चा हा स्मार्टफोन कॅमेऱ्यासाठी विशेष ओळखला जातो. या फोनमध्ये ग्राहकांना 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे तसेच बॅक कॅमेरा सुद्धा 50 मेगापिक्सल चा असून याला ZEISS चे सेंसर सुद्धा देण्यात आले आहे.

महत्वाची बाब म्हणजे बॅक कॅमेरा 100x पर्यंत झूम होतो. अशा स्थितीत आता आपण अमेझॉन वर सुरू असणाऱ्या या ऑफरबाबत डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही विवोचा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर कंपनीचा हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. 

कशी आहे डिस्काउंट ऑफर ?

Vivo X200 FE 5G हा कंपनीचा एक लोकप्रिय स्मार्टफोन असेल. हा एक प्रीमियम फॅन एडिशन (FE) स्मार्टफोन आहे. भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये या फोनचे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरियंट 59,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आले होते.

पण अमेझॉन वर सुरू असणाऱ्या सेलमध्ये हा फोन लॉन्चिंग प्राईस पेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. येथे ग्राहकांना लॉन्चिंग प्राईस पेक्षा जवळपास साडेदहा हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहेत.

Amazon वर सुरू असलेल्या Great Indian Festival Sale मध्ये Vivo X200 FE 5G (12GB रॅम आणि 256GB स्टोरेज) फक्त 54,998 रुपये किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच येथे निवडक बँक कार्ड्सद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 5,500 रुपयांची अतिरिक्त सूट सुद्धा दिली जाणार आहे.

अर्थात बँक ऑफरचा लाभ घेतल्यानंतर ग्राहकांना हा फोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळेल. अशा तऱ्हेने लॉन्चिंग प्राईस पेक्षा ग्राहकांना जवळपास दहा हजार पाचशे रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

विशेष म्हणजे ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. पण एक्सचेंज ऑफर अंतर्गत जुना फोन कितीला विकला जाणार हे त्याच्या मॉडेलवर आणि कंडीशनवर अवलंबून राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe