ऑक्टोबरमध्ये लाँच होणार Vivo कंपनीचे ‘हे’ दोन स्मार्टफोन !

Published on -

Vivo Upcoming Smartphone : ऑक्टोबर महिन्यात काही स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या नवीन हँडसेट लॉन्च करणार आहेत. विवो सुद्धा या महिन्यात दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. नक्कीच जर तुम्हाला विवो चा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरणार आहे.

या महिन्यात दिवाळीचा मोठा सण साजरा केला जाणार आहे. दिवाळीनिमित्ताने तसेच भाऊबीज निमित्ताने अनेक जण नवीन स्मार्टफोन खरेदी करतील. भाऊबीजेला गिफ्ट म्हणून भाऊराया आपल्या बहिणींना नवा फोन गिफ्ट देतील.

तुम्हालाही तुमच्या बहिणीला नवा स्मार्टफोन गिफ्ट द्यायचा असेल तर नक्कीच विवोचे हे नवीन फोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहेत. खरे तर या महिन्यात वनप्लस, विवो, ओप्पो मोटो अशा अनेक कंपन्या आपले नवीन मॉडेल लॉन्च करणार आहेत. पण आज आपण विवोच्या अपकमिंग स्मार्टफोन बाबत माहिती पाहूयात.

कोणते आहेत ते स्मार्टफोन?

Vivo V60e – कंपनीचा हा नवा स्मार्टफोन येत्या चार दिवसांनी अधिकृत रित्या विक्रीसाठी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. 7 ऑक्टोबरला या फोनची लॉन्चिंग असून या फोनमध्ये ग्राहकांना अनेक नवनवीन फीचर्स मिळणार आहेत. या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये Mediatek Dimensity 7300 हे प्रोसेसर दिले जाणार आहे.

या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप राहणार आहे. 50 मेगापिक्सल प्रायमरी + आठ मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड कॅमेरा असा हा सेटअप राहील. फोनमध्ये डायमंड शील्ड ग्लासच्या प्रोटेक्शन सोबत क्वाड कर्व्ह स्क्रिन राहणार आहे. यात 6500 mAh बॅटरी राहील. अर्थात या फोनचा बॅटरी बॅकअप आणि कॅमेरा फारच उत्कृष्ट राहील.

Vivo X300 Series – या महिन्यात कंपनी ही नवीन सिरीज सुद्धा लाँच करणार आहे. कंपनीच्या X300 सीरीज मध्ये दोन मॉडेल असतील. ह्या लाइनअपमध्ये Vivo X300 आणि X300 प्रो हे दोन स्मार्टफोन राहतील. ज्यांना प्रीमियम फोन खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी हे डिवाईस बेस्ट ठरतील.

दोघेही मॉडेल मीडियाटेक डायमेंसिटी 9500 चिपसेटसह येऊ शकतात. हे फोन अँड्रॉइड 16 च्या आधारे ओरिजिन ओएस 6 वर चालतील. याच्या प्रो मॉडेलमध्ये 16 जीबी रॅम, 1 टीबी यूएफएस 4.1 फोर-लेन स्टोरेज असेल. याला 6,510 एमएएच बॅटरी दिली जाईल. Vivo एक्स 300 प्रो मध्ये व्हीएस 1 आणि व्ही 3+ चिप्स देखील असतील. त्याच वेळी, एक्स 300 मध्ये एक लहान बॅटरी आणि 6.31-इंचाची स्क्रीन असेल.

ही सीरीज 13 ऑक्टोबर रोजी चीन मध्ये लॉन्च केला जाणार आहे. चीनमध्ये लॉन्च झाल्यानंतर हा फोन भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होईल. भारतात याची किंमत साधारणतः 70 हजार रुपये असू शकते. त्यामुळे जर तुम्हालाही विवोचा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या फोनचा विचार तुम्ही करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe