Vivo Upcoming Smartphone : नवा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. विवो येत्या काही दिवसांनी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. ज्यांचे बजेट चाळीस हजारांच्या आत असेल त्यांच्यासाठी विवो चा हा स्मार्टफोन फायद्याचा राहणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार 7 ऑक्टोबर रोजी विवो v60e हा आपला नवीन हँडसेट लाँच करणार आहे. जर तुम्हालाही मोबाईल फोटोग्राफीसाठी व व्हिडिओग्राफीसाठी नवीन स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी विवो चा हा अपकमिंग स्मार्टफोन नक्कीच फायदेशीर पर्याय राहणार आहे.

या नव्या स्मार्टफोन मध्ये कंपनी 200 मेगापिक्सल चा कॅमेरा सेटअप देणार आहे. दरम्यान आता आपण याचे फीचर्स कसे राहणार तसेच याची संभाव्य किंमत काय असू शकते याबाबतचा आढावा आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असतील फिचर्स?
अँड्रॉइड हँडसेट विकत घेण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही काही दिवस वाट पाहायला हवी. स्मार्टफोन मार्केटमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असताना आता Vivo 7 ऑक्टोबर रोजी आपला नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. Vivo V60e येत्या पाच दिवसांनी लॉन्च होणार असल्याची माहिती समोर आलीये.
दरम्यान हा फोन लाँच होण्याआधीच याचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स लीक झाले आहेत. रिपोर्टनुसार विवोच्या अपकमिंग फोनमध्ये एक चांगला कॅमेरा सेटअप राहणार आहे. हा स्मार्टफोन खास फोटोग्राफीसाठी डेव्हलप करण्यात आला आहे.
यामध्ये 200MP चा मुख्य कॅमेरा OIS सपोर्टसह उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे कमी लाईट असतानाही चांगले फोटोज आणि व्हिडिओज काढता येतील. तसेच लांबून फोटो काढायचा असला तरी सुद्धा चांगली क्लॅरिटी मिळणार आहे.
या फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स व 50MP सेल्फी कॅमेरा Eye-AF तंत्रज्ञान सुद्धा राहणार आहे. कंपनीने यात Aura Light आणि AI Festival Portrait सारखे स्पेशल फीचर्स सुद्धा दिलेले आहेत. या फोनचे डिझाईन सुद्धा आकर्षक राहणार आहे. यात Quad-Curved AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
त्यामुळे हा स्मार्टफोन फारच प्रीमियम दिसणार आहे. या स्मार्टफोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले आहे. या फोनला धूळ व पाण्यापासून कोणतीच हाणी होणार नाही. परफॉर्मन्ससाठी यात MediaTek Dimensity 7360-Turbo चिपसेट दिली आहे. 6500mAh ची मोठी बॅटरी असेल.
किंमत किती असणार ?
8 GB Ram + 128 GB Storage – 34,999 रुपये
8 GB Ram + 256 GB स्टोरेज – 36,999 रुपये
12 GB Ram + 256 GB – 38,999 रुपये