Vivo V25 5G : मजबूत बॅटरी, दमदार फीचर्स असणाऱ्या ‘या’ फोनवर मिळत आहे सर्वात मोठी सवलत; जाणून संपूर्ण ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:
Vivo V25 5G

Vivo V25 5G : जर तुम्ही मजबूत बॅटरी आणि दमदार फीचर्स असणारा कोणता 5G स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आता तुम्ही Vivo V25 5G हा फोन खरेदी करू शकता ते देखील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सवलतीमध्ये.

अशी शानदार संधी फ्लिपकार्टवर फक्त तुमच्यासाठीच उपलब्ध आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या. ही सेल संपल्यानंतर तुम्हाला यावर कोणतीही सवलत मिळणार नाही. या फोनमधील कॅमेऱ्याच्या साहाय्याने तुम्ही सहज रील्स आणि व्हिडिओ बनवू शकता.

किमतीविषयी बोलायचे झाले तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची मूळ किंमत 34,999 रुपये इतकी आहे. परंतु आता तुम्ही हा फोन डिस्काउंटनंतर 29,999 रुपयांना खरेदी करू शकता. इतकेच नाही तर बँक ऑफर्समध्ये ते 1500 रुपयांनी स्वस्त होईल. हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी 699 रुपयांचे Spotify प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत देत आहे. या फोनचा EMI 1,026 रुपयांपासून सुरू होतो.

जाणून घ्या Vivo V25 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Vivo V25 5G हा स्मार्टफोन 1080×2404 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.44-इंच फुल एचडी डिस्प्लेसह येतो. AMOLED डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर 12 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट दिला आहे. तसेच कंपनी या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत व्हर्चुअल रॅम देत आहे. तर फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले आहेत.

यात 8-मेगापिक्सेल वाइड-एंगल लेन्स आणि 64-मेगापिक्सेल मुख्य लेन्ससह 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. तर कंपनी सेल्फीसाठी 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत असून हा स्मार्टफोन 4500mAh बॅटरीने सुसज्ज आहे. जी बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.2 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe