Vivo V29 5G : विवो लाँच करणार शानदार वैशिष्ट्ये असलेला स्मार्टफोन! मिळणार 50 कॅमेरा, 8GB रॅम, 80W जलद चार्जिंग सुविधा, किंमत फक्त…

Ahmednagarlive24 office
Published:
Vivo V29 5G

Vivo V29 5G : सध्या 5G स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अशातच आता जर तुम्ही 5G खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण आता लवकरच सर्वात आघाडीची टेक कंपनी विवोचा शानदार फीचर्स असणारा स्मार्टफोन बाजारात लाँच होणार आहे.

कंपनी लवकरच Vivo V29 5G हा 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये 50 कॅमेरा, 8GB रॅम, 80W जलद चार्जिंग सुविधा मिळणार आहे. कंपनी अनेक दिवसांपासून या फोनवर काम करत आहे. अशातच कंपनी आता हा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

कंपनीचा नवीन Vivo V29 5G स्मार्टफोन

कंपनीचा Vivo V29 5G हा मिड-रेंज V-सिरीज अंतर्गत नवीनतम स्मार्टफोन आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरद्वारे समर्थित असून या स्मार्टफोनला 120Hz रिफ्रेश रेटसह मोठा AMOLED डिस्प्ले मिळत आहे. या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास तर याच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP प्राथमिक कॅमेरा आहे.

कंपनीचा मॉडेल क्रमांक V2250 सह Vivo V29 5G BIS प्रमाणन वेबसाइटवर पाहायला मिळाला आहे. Vivo V29 BIS सूची फीचर्सच्या बाबतीत काहीही माहिती देत नाही. दरम्यान, कंपनीचा हा स्मार्टफोन या पूर्वी युरोपमध्ये लॉन्च झाला आहे. जाणून घेऊयात Vivo V29 5G ची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

Vivo V29 5G फीचर्स आणि स्पेसिफिकेशन (अपेक्षित)

डिस्प्ले: 6.78-इंच वक्र AMOLED डिस्प्ले, फुल HD (2800 × 1260 पिक्सेल) रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10
प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 778G Adreno 642L GPU सह
मेमरी आणि स्टोरेज: 8GB RAM आणि 256GB स्टोरेजऑडिओ: स्टिरिओ स्पीकर सेटअप, हाय-रिस ऑडिओ
फ्रंट कॅमेरा: ड्युअल सॉफ्ट एलईडी फ्लॅशसह 50MP कॅमेरा
कॅमेरा: OIS सह 50MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स, 2MP फ्रंट कॅमेरा आणि ऑरा लाइट फ्लॅश
बॅटरी आणि चार्जिंग: 4600mAh, 80W फास्ट चार्जिंग, Type-C चार्जिंग पोर्ट
सुरक्षा: इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर
इतर: IP68 धूळ आणि पाणी प्रतिरोधक

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe