Vivo V50 Elite Edition : Vivo आपल्या स्मार्टफोन श्रेणीचा वेगाने विस्तार करत असून भारतीय बाजारात नवनवीन फोन लाँच करत आहे. नुकताच कंपनीने Vivo V50e स्मार्टफोन सादर केला होता, ज्यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता Vivo V50 सीरिजमध्ये आणखी एक धमाकेदार फोन लाँच होण्याच्या तयारीत आहे – Vivo V50 Elite Edition. या फोनबद्दल अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी एका विश्वसनीय टिपस्टरने याची माहिती उघड केली आहे, त्यामुळे याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
टेक टिपस्टर योगेश ब्रार यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून Vivo V50 Elite Edition लवकरच लाँच होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी फोनच्या संभाव्य फीचर्स किंवा लॉन्चच्या तारखेबाबत कोणतीही माहिती दिलेली नसली, तरीही Vivo V50e च्या स्पेसिफिकेशन्सकडे पाहता Elite Edition त्याहून अधिक पॉवरफुल आणि प्रीमियम फीचर्ससह येण्याची शक्यता आहे. Vivo ने याआधी V50 आणि V50 Lite लाँच केले असून आता Elite Edition त्याच मालिकेत एक हाय-एंड पर्याय ठरणार आहे.

फीचर्स-
Vivo V50e मध्ये जे काही फीचर्स देण्यात आले आहेत, त्यावरून अंदाज बांधता Elite Edition मध्ये याहूनही उच्च दर्जाचे प्रोसेसर, उत्तम कॅमेरा परफॉर्मन्स आणि वेगवान चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. V50e मध्ये 6.77-इंचाचा क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, MediaTek Dimensity 7300 चिपसेट, 8GB पर्यंत रॅम, 256GB स्टोरेज, 5600mAh बॅटरी, 90W फ्लॅश चार्ज आणि Android 15 आधारित FunTouch OS 15 दिले आहे.
Vivo V50e चा मुख्य कॅमेरा Sony IMX882 सेन्सरसह 50MP OIS सपोर्टेड असून त्याला 8MP वाइड अँगल कॅमेरा आणि 50MP फ्रंट सेल्फी कॅमेरा जोडले आहेत. फोनमध्ये IP68/IP69 रेटिंग, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, AI Aura Portrait Light 2.0 आणि अंडरवॉटर फोटोग्राफी यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे Elite Edition मध्ये या सर्वांपेक्षा आणखी अपडेटेड तांत्रिक वैशिष्ट्ये असतील अशी अपेक्षा आहे.
कधी लाँच होणार?
Vivo V50 Elite Edition नेमका कधी लाँच होणार आणि त्याची किंमत किती असेल, हे अजून समोर आलेले नाही. मात्र, ब्रँडने ज्या प्रकारे अलिकडच्या काळात प्रीमियम फोन सादर केले आहेत, त्यामुळे Elite Edition हा एक Flagship लेव्हलचा फोन असू शकतो. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता, दमदार परफॉर्मन्स, उत्तम कॅमेरा आणि आधुनिक डिझाईनसह Vivo चा हा फोन लवकरच स्मार्टफोन बाजारात लक्ष वेधून घेऊ शकतो.