Vivo V50 घेऊन येत आहे धमाका! 50MP कॅमेरा आणि तगडी बॅटरीसह किंमत फक्त इतकी!

Vivo ने बहुप्रतिक्षित Vivo V50 स्मार्टफोनच्या लाँच तारखेची अधिकृत घोषणा केली आहे. हा नवीन स्मार्टफोन 17 फेब्रुवारी 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे. हा फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Vivo V40 ची जागा घेणार आहे आणि याबाबत अनेक तर्क-वितर्क आणि अंदाज वर्तवले जात आहेत.

Ratnakar Ashok Patil
Published:

Vivo V50 Smartphone:- Vivo ने बहुप्रतिक्षित Vivo V50 स्मार्टफोनच्या लाँच तारखेची अधिकृत घोषणा केली आहे. हा नवीन स्मार्टफोन 17 फेब्रुवारी 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे. हा फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Vivo V40 ची जागा घेणार आहे आणि याबाबत अनेक तर्क-वितर्क आणि अंदाज वर्तवले जात आहेत.

Vivo ने हा फोन प्रो-लेव्हल पोर्ट्रेट फोटोग्राफी आणि आकर्षक डिझाइन देण्यासाठी डिझाइन केला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा फोन फोटोग्राफीप्रेमींसाठी आणि स्टायलिश डिझाइन पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

लॉन्च झाल्यानंतर कुठे करता येईल खरेदी?

Vivo V50 हा स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर Amazon आणि Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होईल. तसेच 24 फेब्रुवारी 2025 पासून हा फोन ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये देखील विक्रीसाठी उपलब्ध होईल.

कंपनीने अद्याप या स्मार्टफोनचे प्रोसेसर आणि इतर हार्डवेअर कॉन्फिगरेशनबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र अनेक रिपोर्ट्सनुसार हा फोन अत्याधुनिक फीचर्ससह येईल आणि त्यात दमदार प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे.

कसा असेल डिस्प्ले?

डिझाइनच्या बाबतीत Vivo V50 मध्ये क्वाड कर्व्ह डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. जो फोनला अधिक प्रीमियम लुक देईल. हा फोन रोझ रेड, टायटॅनियम ग्रे आणि स्टारी ब्लू अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

रिपोर्ट्सनुसार, हा फोन IP68 आणि IP69 सर्टिफिकेशनसह येईल व त्यामुळे तो धूळ आणि पाण्यापासून अधिक सुरक्षित असेल. याचा अर्थ हा फोन हलक्या पाण्यात भिजल्यास त्याला कोणताही धोका होणार नाही.

कशी असेल बॅटरी?

बॅटरीच्या दृष्टीने Vivo V50 मध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी असू शकते. जी एकाच चार्जमध्ये दिवसभराचा बॅकअप देईल. मागील मॉडेल Vivo V40 मध्ये 5500mAh बॅटरी होती.

त्यामुळे नवीन मॉडेलमध्ये सुधारित बॅटरी क्षमता पाहायला मिळेल. याशिवाय हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित FunTouch OS 15 या नवीनतम कस्टम यूआयसह येण्याची शक्यता आहे.

कसा असेल कॅमेरा?

फोटोग्राफीसाठी Vivo V50 मध्ये Zeiss-ब्रँडेड ड्युअल 50MP रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे.जो उत्कृष्ट पोर्ट्रेट आणि लो-लाइट फोटोग्राफी करण्यास सक्षम असेल. तसेच 50MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

ज्यामुळे उत्तम दर्जाचे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव मिळेल. Vivo च्या मते, हा फोन फोटोग्राफीच्या दृष्टीने एक प्रो-लेव्हल स्मार्टफोन ठरणार आहे आणि त्यात AI-आधारित अनेक कॅमेरा फीचर्स दिली जातील.

किती असू शकते किंमत?

Vivo V50 ची संभाव्य किंमत मागील मॉडेल Vivo V40 प्रमाणेच असण्याची शक्यता आहे. Vivo V40 भारतात 34,999 च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. त्यामुळे Vivo V50 देखील जवळपास त्याच किंमतीत येईल किंवा किंचित स्वस्त दरात लाँच केला जाईल. लाँच इव्हेंटमध्ये या फोनच्या अधिकृत किंमतीबद्दल अधिक माहिती मिळेल.

Vivo V50 हा दमदार बॅटरी, अत्याधुनिक कॅमेरा आणि प्रीमियम डिझाइन यांसाठी ओळखला जाणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर हा फोन तुम्हाला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम फोटोग्राफी अनुभव देऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe