Vivo Y100 5G : विवोच्या ‘या’ 5G फोनवर मिळत आहे आकर्षक ऑफर! 22,600 रुपयांच्या सवलतीत येईल खरेदी करता

Ahmednagarlive24 office
Published:
Vivo Y100 5G

Vivo Y100 5G : तुमची आता विवोच्या 5G स्मार्टफोनवर हजारो रुपयांची बचत होईल. कारण यावर तुम्हाला अनेक ऑफर्स मिळत आहेत. त्यामुळे स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी गमावू नका. अशी भन्नाट संधी Amazon वर मिळत आहे.

या सेलमध्ये तुम्ही Vivo Y100 5G हा फोन एक्सचेंज ऑफरमुळे 22,600 रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 29,999 रुपये आहे. यावर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. बँक ऑफरमध्ये 2,000 रुपयांपर्यंत स्वस्तात फोन खरेदी करता येईल.

परंतु हे लक्षात ठेवा की तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या जुन्या फोनची स्थिती उत्तम असावी. काही दिवसांसाठीच ही सेल असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या.

जाणून घ्या Vivo Y100 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.38-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या डिस्प्लेची ब्राइटनेस पातळी 1300 nits इतकी आहे. याच्या स्टोरेजबद्दल विचार केला तर हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज पर्यायात तुम्हाला खरेदी करता येईल. या फोनची एकूण रॅम गरजेनुसार 16GB पर्यंत वाढवता येते. प्रोसेसर म्हणून या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट दिला आहे.

तसेच या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 64-मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह दोन 2-मेगापिक्सेल कॅमेऱ्यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरसह येईल. कंपनीच्या फोनचा फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असून कलर चेंजिंग बॅक पॅनल असणाऱ्या या फोनमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे.

44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट ही बॅटरी करते. जोपर्यंत OS चा संबंध आहे, तोपर्यंत हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर काम करेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी, वाय-फाय आणि ब्लूटूथसह सर्व मानक पर्याय देण्यात आले आहेत. मेटल ब्लॅक, पॅसिफिक ब्लू आणि ट्वायलाइट गोल्ड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe