Vivo Y22 : जर तुम्ही कमी किमतीत विवोचा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर Amazon ची सेल तुमच्यासाठी आहे. तुम्ही आता Amazon वरून Vivo Y22 हा स्मार्टफोन मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 19,990 रुपये इतकी आहे.
जो तुम्ही आता 17% डिस्काउंटनंतर 16,499 रुपयांना सहज खरेदी करू शकता. यावर तुम्हाला बँक ऑफर तसेच एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो. परंतु हे लक्षात घ्या की एक्सचेंज ऑफर तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर अवलंबून असणार आहे.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा स्मार्टफोन 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. यात कंपनीने MediaTek Helio G85 चिपसेट दिला आहे. या फोनचा डिस्प्ले HD+ रिझोल्युशनसह येत असून त्याचा आकार 6.55 इंच आहे आणि तो 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
तसेच या स्मार्टफोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह दोन रियर कॅमेरे तुम्हाला पाहायला मिळू शकतात. यात 50-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेशअसून तर सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000mAh बॅटरी दिली आहे. हे 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच जोपर्यंत OS चा संबंध आहे, तोपर्यंत हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित FunTouch OS 12 UI वर काम करेल. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय दिले आहेत. हा स्मार्टफोन Starlit Blue आणि Metaverse Green रंगात तुम्हाला खरेदी करता येईल.