Upcoming Smartphone : विवोचा पुढील आठवड्यात मोठा धमाका! फक्त 8,000 रुपयांमध्ये लॉन्च करणार “हा” फोन

Upcoming Smartphone : विवो कंपनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नेहमीच नवीन फोन मार्केटमध्ये आणत आहे. अशातच विवो आता आपला अजून एक नवीन फोन बाजरपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चीनी कंपनी यासह आपली Y-सीरीज स्मार्टफोन रेंज वाढवणार आहे.

नवीन Vivo Y02 हा एंट्री-लेव्हल फोन असेल. तसेच सर्वसामान्यांना परवडणारा देखील असेल. लीक रिपोर्टनुसार, कंपनीचा हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर चिपसेट आणि 5,000mAh बॅटरीसह येऊ शकतो.विवो हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करू शकते.

Vivo Y02 with 5,000mAh battery launched in Indonesia

पण विवोने अद्याप फोनच्या लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. पण एका बातमीने दावा केहल आहे की, हा आगामी Vivo स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. चला तर मग एक नजर टाकूया Vivo Y02 ची भारतातील किंमत आणि वैशिष्ट्ये…

Vivo Y02 किंमत

Vivo Y02 एकाच प्रकारात लॉन्च केला जाऊ शकतो. फोन 3GB RAM सोबत 32GB स्टोरेज सह येण्याची शक्यता आहे. इंडोनेशियामध्ये त्याची किंमत IDR 1,499,000 (अंदाजे रु. 8,000) आहे.

Vivo Y02 The Affordable Phone To Step In India | Cashify News

Vivo Y02 स्पेसिफिकेशन्स

Vivo Y02 स्मार्टफोन 6.51-इंचाच्या HD फुलव्यू डिस्प्लेसह येऊ शकतो. MediaTek Helio P22 octa-core SoC चिप स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून वापरली जाऊ शकते. यासोबत कंपनीचा हा स्मार्टफोन 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज सह येऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

हँडसेट कंपनीच्या स्वतःच्या Funtouch OS 12 वर चालू शकतो, जो Android 12 Go Edition ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. बॅटरी बद्दल सांगायचे तर Vivo Y02 फोन मध्ये 5,000 mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

Vivo Y02 launched know price and Specification details

स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी f/2.0 अपर्चर असलेला 8MP कॅमेरा दिसू शकतो. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, हँडसेटमध्ये समोर f/2.2 अपर्चर असलेला 5MP कॅमेरा असू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe