Lava Bold 5G vs Motorola Edge 60 Fusion | जर तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर थोडी वाट बघा. पुढील आठवड्यात दोन दमदार स्मार्टफोन भारतीय बाजारात पहिल्यांदाच विक्रीसाठी येत आहेत. Lava Blaze 5G Bold आणि Motorola Edge 60 Fusion. दोन्ही फोन आपल्या खास वैशिष्ट्यांमुळे चर्चेत आहेत आणि वेगवेगळ्या किंमत श्रेणीत येतात. चला पाहूया, यापैकी कोणता फोन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.
Lava Blaze Bold 5G
Lava Blaze Bold 5G ची विक्री 8 एप्रिलपासून Amazon वर सुरू होणार आहे. फोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे – 4GB RAM + 128GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज. याची सुरुवातीची किंमत फक्त 10,499 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा 3D कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आहे. यामध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. Lava Bold 5G Android 14 वर चालतो आणि Android 15 अपडेटसह दोन वर्षांच्या सिक्युरिटी अपडेटसाठी पात्र आहे.

फोटोग्राफीसाठी, यात 64MP Sony सेन्सरसह एआय रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. IP64 सर्टिफिकेशनमुळे हा फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 5,000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग यासारखी फीचर्स यामध्ये आहेत.
Motorola Edge 60 Fusion
दुसरीकडे, Motorola Edge 60 Fusion ची विक्री 9 एप्रिलपासून Flipkart आणि Motorola India च्या वेबसाइटवर सुरू होणार आहे. हा फोन 8GB+256GB व्हेरिएंटसाठी 22,999 रुपये आणि 12GB+256GB व्हेरिएंटसाठी 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. पँटोन अमेझॉनाइट, स्लिपस्ट्रीम आणि झेफायर अशा खास रंगांमध्ये फोन खरेदी करता येईल.
Motorola Edge 60 Fusion मध्ये 6.7 इंचाचा 1.5K pOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट, 4500 निट्स ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर, 12GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS स्टोरेज दिलं गेलं आहे. मायक्रोSD कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनला Android 15 Pearl आधारित Hello UI मिळालं आहे, जे तीन वर्षांचे OS अपडेट आणि चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देईल.
दोन्ही स्मार्टफोन विविध बजेटसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतात. Lava Bold 5G कमी बजेटमध्ये प्रीमियम डिस्प्ले आणि डिझाइनसह येतो, तर Motorola Edge 60 Fusion मध्ये पावरफुल प्रोसेसर, प्रीमियम डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर अपडेट्सची खात्री मिळते.