Smart Tv Offer : स्मार्ट टीव्ही खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी बातमी आहे. खरे तर अनेकांना नवीन टीव्ही खरेदी करायचा आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट टीव्ही खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अमेझॉन आणि flipkart वर सुरू असलेल्या रिपब्लिक डे सेलचा फायदा होणार आहे. जर तुम्हालाही स्वस्तात 32 इंची स्मार्ट टीव्ही हवा असेल तर या सेलमधून तुम्ही स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. दरम्यान आज आपण फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या रिपब्लिक डे सेलमध्ये ऑफर सुरु असलेल्या 5 बत्तीस इंची स्मार्ट टीव्ही बाबत जाणून घेणार आहोत.
थॉमसन अल्फा HD रेडी एलईडी स्मार्ट लिनक्स टीव्ही : हा 32 इंची टीव्ही आहे. हा टीव्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहकांना अगदी नाममात्र किमतीत खरेदी करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा टीव्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये 7,999 रुपयांना उपलब्ध आहे. यामुळे जर तुमचा आठ हजार रुपयांपर्यंतचा बजेट असेलतर तुमच्यासाठी हा टीव्ही बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. विशेष म्हणजे या टीव्हीच्या खरेदीत तुम्ही बँकेच्या ऑफरचा फायदा घेतला तर तुम्हाला अतिरिक्त सूटही मिळणार आहे. बँकेकडून या टीव्हीसाठी 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. अशा तऱ्हेने हा टीव्ही फक्त साडेसहा हजार रुपयात मिळू शकतो. या टीव्हीमध्ये शक्तिशाली 30W ऑडिओ आउटपुट आणि 32-इंचाचा HD रेडी डिस्प्ले आहे. हा टीव्ही लिनक्स ओएसवर चालतो. निश्चितच शानदार फीचर्स वाला हा टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची ही एक सुवर्णसंधी राहणार आहे.
Blaupunkt Cybersound G2 Series (32 inches) : जर तुमचे बजेट थोडे आणखी म्हणजेच साडे आठ ते नऊ हजार रुपयांपर्यंतचा तुमचा बजेट असेल तर हा TV तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा एक 32 इंची टीव्ही आहे. हा टीव्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये ९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, या दहा हजार रुपयांच्या टीव्हीवर तुम्हाला बँकेच्या ऑफर्स देखील फायदा घेता येणार आहे. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही अतिरिक्त पंधराशे रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळवू शकणार आहात. अशा तऱ्हेने हा टीव्ही तुम्हाला फक्त साडेआठ हजार रुपयात मिळणार आहे. या टीव्हीमध्ये शक्तिशाली 40W ध्वनी आणि 32-इंच HD रेडी डिस्प्ले आहे. हा टीव्ही Android OS वर चालतो. म्हणजेच हा टीव्ही अँड्रॉइड राहणार आहे. ज्यांना स्वस्तात अँड्रॉइड टीव्ही घ्यायचा असेल त्यांच्यासाठी हा टीव्ही फायदेशीर ठरणार आहे.
RGL HD रेडी Android LED स्मार्ट टीव्ही : हा एक 32 इंचीचा टीव्ही आहे. हा स्मार्ट टीव्ही लो बजेट असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या टीव्हीची फ्लिपकार्ट सेल मध्ये 7990 रुपये एवढी किंमत आहे. विशेष बाब म्हणजे बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन यावर अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळवता येणार आहे. बँकेच्या ऑफरचा फायदा घेतला तर पंधराशे रुपये पर्यंतची डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे. अशा तऱ्हेने हा टीव्ही फक्त 6490 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या टीव्हीमध्ये शक्तिशाली 20W ध्वनी आणि 32-इंचाचा HD रेडी डिस्प्ले आहे. हा टीव्ही Android OS वर चालतो. म्हणजेच हा देखील एक अँड्रॉइड टीव्ही राहणार आहे.
TCL iFFALCON : TCL ही एक लोकप्रिय टीव्ही निर्माती कंपनी आहे. या कंपनीचे अनेक TV बाजारात उपलब्ध आहेत. iFFALCON ही देखील कंपनीची एक लोकप्रिय टीव्ही आहे. हा 32 इंची टीव्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये फक्त आणि फक्त 7990 रुपयांना मिळतोय. विशेष म्हणजे या टीव्हीसाठी बँकेची ऑफर देखील मिळणार आहे. बँकेच्या ऑफरचा लाभ घेतला तर ग्राहकांना पंधराशे रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. बँकेच्या ऑफरचा लाभ घेतल्यानंतर हा टीव्ही ग्राहकांना फक्त 6490 रुपयांना मिळणार आहे. या टीव्हीमध्ये शक्तिशाली 24W ऑडिओ आउटपुट आणि 32-इंचाचा HD रेडी डिस्प्ले आहे. हा सुद्धा टीव्ही Android OS वर चालतो.