फास्ट चार्जिंसह लॉन्च झालेल्या OnePlus Ace 3V ची किती आहे किंमत?, बघा…

Content Team
Published:
OnePlus Ace 3V

OnePlus Ace 3V : वनप्लसने नुकताच आपला नवीनतम स्मार्टफोन OnePlus Ace 3V लाँच केला आहे. हा फोन Ace 2V मध्ये अपग्रेड म्हणून आला आहे. यूजर्सना या फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स अनुभवयाला मिळतील. कंपनीने 50 मेगापिक्सलचा Sony IMX882 प्राइमरी कॅमेरासह हा फोन लॉन्च केला आहे . या फोनमध्ये कंपनीने आणखी काय खास फीचर्स दिले आहेत, पाहूया…

OnePlus Ace 3V वैशिष्ट्ये

OnePlus Ace 3V च्या रिव्ह्यू आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.7 इंच फ्लॅट OLED डिस्प्ले, 2160Hz PWM dimming आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. हा फोन 50-मेगापिक्सलचा Sony IMX882 प्राइमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा, 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच यात 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

OnePlus Ace 3V च्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 100W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5,500mAh बॅटरीने सुसज्ज आहे. याशिवाय यात Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ColorOS 14 सह येतो. एवढेच नाही तर तीन वर्षांचे ओएस अपडेट्स आणि ४ वर्षांचे सिक्युरिटी पॅच देणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल गेमिंग अँटेना, वायफाय, एनएफसी, आयआर कंट्रोल इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

OnePlus Ace 3V किंमत

OnePlus Ace 3V च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus Ace 3V च्या 12GB 256GB व्हेरिएंटची किंमत CNY 1,999 (23,085 रुपये) आहे. तर 12GB 512GB व्हेरिएंटची किंमत CNY 2,299 (अंदाजे 26,585 रुपये) आहे. याशिवाय, जर आपण 16GB 512GB वेरिएंटबद्दल बोललो तर त्याची किंमत CNY 2,599 (30,085 रुपये) आहे. हा स्मार्टफोन दोन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe