सध्या उन्हाळा एवढा कडक आहे की, घरोघरी फॅन, कुलर नाहीतर एसी हमखास असतो. आता एसी अगदी स्वस्त मिळत असल्याने अनेकजण तो वापरतात. परंतु एसी वापरताना काही काळजीही घ्यावी लागते. शिवाय त्याची योग्य सेटींग समजली नाही तर, आपल्याला वीजबिलही भरमसाठ येते. काहीजणांना एसीचे तापमान सेट करता आले नाही तर सारखा एसी चालूबंद करावा लागतो. आज आपण एसीच्या अशाच काही सेटींग्ज पाहणार आहोत.
एसीचे तापमान समजावे
उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी घरांमध्ये एसी म्हणजेच एअर कंडिशनरचा वापर सामान्य झाला आहे. उष्णतेपासून आराम फक्त एसीसमोर बसून मिळतो आणि विशेषतः रात्रीच्या वेळी एसीमध्येच शांत झोपता येते. पण बऱ्याचदा आपण रात्री खूप थंड असल्याने एसी बंद करतो आणि गरम झाल्यावर तो चालू करतो. एसी सारखा चालूबंद केल्यानंतर वीजबिल जास्त येण्याचा धोका असतो. बऱ्याचदा आपल्याला रात्री झोपताना एसीचे तापमान किती असावे, हे माहित नसते. त्यामुळे आपली झोप बिघडते.

किती असावे तापमान?
रात्री झोपताना एसीचे तापमान 20 ते 24 अंश सेल्सिअस असावे. यामुळे वातावरण थंड राहील. तुम्हाला चांगली झोपही मिळेल. यामुळे तुम्हाला चांगली झोप तर मिळेलच पण वीज वापरही कमी होईल. घरात वृद्ध लोक असतील तर, एसीचे तापमान 24 अंश सेल्सिअस ठेवावे. कारण वृद्धांना सर्दी लवकर होते. त्यामुळे ते आजारी पडू शकतात.
विजबील कमी कसे होईल?
तुम्हाला असे वाटत असेल की एसी चालवल्यानंतरही जास्त वीज वापर होऊ नये आणि बिल कमी असावे, तर एसीच्या रिमोटमध्ये टायमर सेट करणे लक्षात ठेवा. यामुळे, विजेचा वापर कमी होणार नाही तर थंडीमुळे तुम्हाला ब्लँकेट घालावे लागणार नाही.