Wifi Router : सध्या मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर केला जात आहे. त्यामुळे आता आजकाल अनेक घरांमध्ये वायफाय बसवल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कारण या वायफायमुळे आपल्याला कधीही पाहिजे तेवढे इंटरनेट वापरायला मिळते.
पुरेशा प्रमाणात इंटरनेट असल्यामुळे आपल्याला फिल्म्स, गेम्स खेळायला येतात. परंतु अनेकजण वायफाय रात्रभर चालू ठेवतात. अनेकांना रात्रभर वायफाय राउटर चालू ठेवण्याचे परिणाम माहिती नसतात. त्यामुळे ते 24 तास वायफाय राउटर चालू ठेवतात. जर तुम्हीही असे करत असाल तर वेळीच सावध व्हा. त्यामुळे तुम्हाला काही नुकसान सहन करावे लागते. काय आहेत रात्रभर वायफाय राउटर चालू ठेवण्याचे तोटे जाणून घ्या सविस्तर.
होय, आता जर तुमचा वायफाय राउटर रात्रभर चालू राहिला तर त्यामुळे तुमच्या समस्येत वाढ होऊ शकते. असे अनेकजण आहेत ज्यांना माहित नाही की वायफाय राउटर बंद करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी राउटर बंद केला नाही तर तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसानही होऊ शकते.
रात्रभर वायफाय राउटर चालू ठेवल्याने निर्माण होईल हा धोका
जर तुम्ही तुमचा रात्रभर वायफाय राउटर चालू ठेवला तर घरात झोपलेल्या लोकांच्या शरीराला इजा पोहोचू शकते. कारण त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या घरात असणारा वायफाय राऊटर बंद करावा.
झोपेच्या समस्या
वायफाय राउटरमधून येत असणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. यापैकी एक झोपेच्या समस्येचा समावेश असून तुम्ही आता झोपण्यापूर्वी वायफाय राऊटर बंद केला नाही तर तुम्हाला झोपेची समस्या येऊ शकते. खास करून जर ती व्यक्ती ज्या खोलीत वायफाय राउटर स्थापित आहे ते चालू आहे त्या खोलीत झोपत असेल तर त्या व्यक्तीला निद्रानाशाची समस्या असू शकते, त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये निद्रानाशाची समस्या निर्माण होऊ शकते.