Xiaomi Pad 5 Price : Xiaomi ने काही दिवसांपूर्वी आपला नवीन टॅब्लेट Xiaomi Pad 5 लाँच केला होता. हा 6GB RAM/8GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेज अशा दोन पर्यायात उपलब्ध आहे. किमतीचा विचार केला तर याची किंमत अनुक्रमे 26,999 रुपये आणि 28,999 रुपये इतकी आहे.
परंतु हा तुम्ही तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. दरम्यान कंपनीने नुकताच Xiaomi Pad 6 लॉन्च केला आहे. लॉन्चपूर्वी कंपनीने आपल्या जुन्या टॅब्लेटची म्हणजे Xiaomi Pad 5 ची किंमत कमी केली आहे. त्यामुळे तुम्ही तो कमी किमतीत खरेदी करू शकता.

Xiaomi च्या या टॅबलेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह LCD स्क्रीन देण्यात अआली आहे, जी डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येते. कंपनीने यात क्वाड स्पीकर्स आणि इतर पॉवरफुल स्पेसिफिकेशन्स दिली आहेत.
किंमत
स्टोरेज विचार केला तर Xiaomi Pad 5 चा बेस व्हेरिएंट 6GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो. किमतीचा विचार केला तर याची सुरुवातीची किंमत 26,999 रुपये आहे. त्याचा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 28,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला आहे. कंपनीकडून या दोन्ही प्रकारांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.
किंमत कमी केल्यानंतर, Xiaomi Pad 5 चा बेस व्हेरिएंट 25,999 रुपयांना खरेदी करता येईल, तर 8GB RAM मॉडेलची किंमत 28,499 रुपये असणार आहे. तुम्ही हा टॅबलेट Amazon, Mi.com आणि Mi स्टोअर्सवर कॉस्मिक ब्लॅक कलरमध्ये खरेदी करू शकता.
जाणून घ्या फीचर्स
याला 10.95-इंचाचा WQHD+ LCD पॅनेल मिळत आहे जो 120Hz रिफ्रेश रेट तसेच 2560×1600 पिक्सेल रिझोल्यूशन, 650 nits ब्राइटनेससह येतो. याचा डिस्प्ले 16:10 आस्पेक्ट रेशो आणि डॉल्बी व्हिजनसह येतो. हा टॅबलेट Qualcomm Snapdragon 860 प्रोसेसरवर काम करेल जो Adreno 640 GPU सह येतो.
हा टॅब्लेट दोन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असून कंपनीने यात 6GB RAM/8GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेजचा पर्याय दिला आहे. यात 8,720mAh बॅटरी दिली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग पॉवर सपोर्टसह येते. यात Xiaomi Pad 5 मध्ये 13MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
तसेच याच्या फ्रंटमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा टॅब्लेट Android 11 वर आधारित MIUI 12.5 पॅड स्किनसह येते. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये ब्लूटूथ 5.0, ड्युअल वाय-फाय 2.4/5GHz बँड आणि USB टाइप-सी असेल.