Apple : अय्यो! काय सांगता…’या’ आय – फोनच्या किंमतीत चक्क घर मिळू शकतं…!

Ahmednagarlive24 office
Published:
Apple

Apple : आपण जाणतोच टेक कंपन्यांमध्ये सर्वात महागडा फोन म्हणजे iPhone. या फोनची किंमत जास्त असली तरी देखील ग्राहक मोठ्या प्रमाणात याची खरेदी करतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का Apple चा असा एक फोन आहे ज्याची किंमत इतकी जास्त आहे की, त्या किंमतीत एक घर खरेदी करू शकता. होय, तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ते सत्य आहे.

iPhone 15 Pro गेल्या वर्षी भारतात 1.35 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. Apple चा हा प्रीमियम फोन iPhone 15, iPhone 15 Plus आणि iPhone 15 Pro Max सह आला आहे. आता या फोनचे स्पेशल Visio Pro एडिशन लाँच करण्यात आले आहे, ज्याच्या किंमतीत तुम्ही घर खरेदी करू शकता. लक्झरी स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Cavier ने हे स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे.

Apple iPhone व्यतिरिक्त, Cavier ने Samsung फोनचे Gold आणि Diamond Luxury Editions देखील लॉन्च केले आहेत. कंपनीने आता iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ची Vision Pro आवृत्ती सादर केली आहे. हे दोन्ही फोन ऍपल व्हिजन प्रोच्या डिझाइनपासून प्रेरित आहेत. या आवृत्तीची सुरुवातीची किंमत US $ 8,060 म्हणजेच अंदाजे 6,68,000 रुपये आहे. तर 1TB iPhone 15 Pro Max ची किंमत US$9,560 (अंदाजे 7,92,933) पेक्षा जास्त आहे.

iPhone 15 Pro ची वैशिष्ट्ये

Apple iPhone 15 Pro मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे, जो ProMotoion, Always-On आणि Dynamic Island सारख्या वैशिष्ट्यांना सपोर्ट करतो. या आयफोनमध्ये टायटॅनियम डिझाइन आहे, ज्यामध्ये ॲक्शन बटण देखील उपलब्ध आहे.

या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48MP मुख्य कॅमेरा उपलब्ध आहे. फोनचा मागील कॅमेरा सुपर हाय रिझोल्युशन इमेजेस कॅप्चर करू शकतो. याशिवाय यात 3x टेलीफोटो कॅमेराही उपलब्ध आहे. iPhone 15 Pro मध्ये A17 Pro बायोनिक चिप आहे. याशिवाय हा iPhone USB टाइप C चार्जिंग फीचरला सपोर्ट करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe