YouTube Income Tips : आजकाल अनेकजण युट्युबवरून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. मनोरंजक व्हिडिओ अपलोड करून ते लोकप्रिय होत आहेत. युट्युबवर अनेकजण छोटे-मोठे व्हिडीओ अपलोड करून बंपर पैसे कमवत आहेत.
सध्या अनेकजण सतत इंटरनेटवर लोकप्रिय व्हिडीओ पाहत असतात. मनोरंजक किंवा माहितीपुरक व्हिडीओ पाहण्यासाठी अनेकजण युट्युबचा वापर करत असतात. या ठिकणी अनेकांनी अपलोड केलेले व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळत असतील.
युट्युबवरून काही निवडक वापरकर्त्ये दर महिन्याला चांगली कमाई करत आहेत. मात्र अनेकांना युट्युबवर किती सबस्क्राइबर्स झाल्यानंतर किती पैसे मिळतात हे माहिती नसते. तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
YouTube कमाई म्हणजे काय?
YouTube वर अनेकजण दरमहा चांगली कमाई करत आहेत. मात्र YouTube वर व्हिडीओ अपलोड करण्यासाठी काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या व्हिडीओद्वारे पाहणाऱ्यांचे अनुसरण झाले पाहिजे.
मुद्रीकरण धोरणांतर्गत, YouTube दृश्यांनुसार पेमेंट देते.
निर्मात्यांची कमाई देखील श्रेणीनुसार ठरविली जाते.
तुम्ही भारतीय निर्माता असल्यास, YouTube डॉलरमध्ये पैसे देते.
हे तांत्रिकदृष्ट्या RPM (रेव्हेन्यू प्रति मिल) आणि CPM (कॉस्ट प्रति 1,000 इंप्रेशन) मध्ये मोजले जाते.
YouTube वरून कमाई करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी जाहिराती, चॅनल सबस्क्राइबर्स,
YouTube प्रीमियम महसूल, सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स हे मुख्य आहेत.
कमाईचे निकष
तुम्हालाही YouTube वरून कमाई करायची असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम YouTube वर एक चॅनेल सुरु करावा लागेल. YouTube वरून पैसे मिळवण्यासाठी तुमचे 1000 सबस्क्राइबर्स असणे आवश्यक आहे.
तुमच्या चॅनेलवर 4,000 हजार तासांचा पाहण्याचा वेळ गेल्या 12 महिन्यांत पूर्ण झाला असावा. तसेच अपलोड केलेल्या व्हिडीओला 3 महिन्यांत 10 दशलक्ष व्ह्यूज पूर्ण केले पाहिजेत.