Ahmednagar Rain News : वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Published on -

Ahmednagar Rain News : भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात २१ ते २२ जुलै या कालावधीमध्ये गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वान्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगत आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल,

सायकल यांच्यापासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या केबलपासून दूर रहावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe