पंजाब डख : 10 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील या जिल्ह्यात अवकाळीची शक्यता ! फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातही पाऊस पडणार का ?

Ahmednagarlive24 office
Published:
Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या माध्यमातून एक नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. खरंतर या आधी देखील पंजाबरावांनी हवामान अंदाज दिला होता. त्या अंदाजात पंजाबरावांनी महाराष्ट्रात आगामी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.

यानुसार सध्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे आज पुन्हा एकदा पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. यामध्ये पंजाबरावांनी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 10 जानेवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

एवढेच नाही तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पाऊस पडणार का याबाबत देखील एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत आज आपण पंजाबरांचा नवीन हवामान अंदाज सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय म्हणालेत पंजाबराव ?

पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, आज 5 जानेवारी 2024 ते 10 जानेवारी दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार आहे. राज्यातील नागपुर, वर्धा, अकोला, वासिम, यवतमाळ, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, अहमदनगर,

उस्मानाबाद, बार्शी, कर्नाटक, पुणे या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये तुरळक ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पण या काळात महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर, बार्शी, येरमाळा, उस्मानाबाद, बीड,

अहमदनगर, पाथर्डी, माजलगाव, लातूर, उदगीर, परभणी, नांदेड, शेलु, पाथरी, जिंतूर, रिसोड, हिंगोली, वाशिम, अकोला, अकोट या भागात थोडा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. या संबंधित भागात पेंडओल होईल एवढा पाऊस पडू शकतो असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे.

सोबतच 10 जानेवारी नंतर महाराष्ट्रातील हवामान कोरडे होणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. मात्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे, 22 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 या कालावधीमध्ये राज्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe