वातावरणात पुन्हा बदल ! थंडीचा जोर ओसरणार, ‘या’ जिल्ह्यांत पाऊस तर ‘या’ भागात असणार दाट धुके

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : वर्षभर विषम वातावरण दिसले. कोणताही ऋतू व्यवस्थित पार पडलेला दिसला नाही. सध्या थंडीचा ऋतू सुरूआहे. मागील काही दिवसांत थंडी चांगली जाणवू लागली होती. रबी पिकांनाही पोषक वातवरण निर्माण झाले होते.

परंतु पुन्हा एकदा वातावरणात बदल होणार आहे. राज्यात दक्षिणेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात बदल होईल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे. या वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे थंडीचा जोर काहीसा ओसरला आहे.

३१ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान किमान तापमान दोन अंशाने वाढणार आहे. महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.

दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. त्याने थंडी कमी होऊन तापमानात वाढ झाली. उत्तर भारतात बुधवारी दाट धुक्याचा परिणाम दिसून आला. दिल्ली-एनसीआर मध्ये याचाच प्रभाव जास्त जाणवला.

येथे दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी होती. उत्तरेत तीन ते चार दिवस धुके राहील असे हवामान खात्याने म्हटले आहे. वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागात दाट किंवा अतिदाट धुके कायम राहण्याची शक्यता असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe