Climate change : हवामान बदलाचे मोठे परिणाम पाहायला मिळणार ! 2023 मध्ये असणार सर्वात जास्त…

Published on -

संयुक्त राष्ट्र हवामान संस्थेने २०२३ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद होणे जवळपास निश्चित आहे आणि हा चिंताजनक कल भविष्यात पूर, जंगलातील आग, वितळणाऱ्या हिमनद्या आणि अतिउष्णतेमध्ये वाढ याचे संकेत देतात, असे म्हटले आहे.

जागतिक हवामान संघटनेनेदेखील २०२३ मधील सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक काळापेक्षा १.४ अंश सेल्सिअस जास्त असेल, असा इशारा दिला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला एल निनोच्या प्रारंभामुळे पुढील वर्षी सरासरी तापमान पॅरिसमध्ये निर्धारित १.५ अंश लक्षीत मर्यादेपेक्षा जास्त होऊ शकते. एल निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातील तापमानात झालेली वाढ.

पुढील ४ वर्षांत आपण तात्पुरत्या आधारावर १५ अंशांपर्यंत पोहोचू आणि पुढील दशकात कमी-अधिक प्रमाणात कायमस्वरूपी त्याच अंशांवर असू, असे जागतिक हवामान संघटनेचे सरचिटणीस पेटेरी तालास यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांची सीओपी २८ वार्षिक हवामान परिषद गुरुवारपासून दुबईमध्ये सुरू झाली असून, त्याचवेळी जागतिक हवामान संघटनेने हे आपले निष्कर्ष नोंदवले आहेत.

येणाऱ्या हजारो वर्षांमध्ये हिमनदीचे नुकसान आणि समुद्र पातळी वाढण्याकडे लक्ष वेधताना तालास म्हणाले, आपण तापमानात २.५ ते ३ अंश वाढीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. याचा अर्थ आपल्याला मोठ्या प्रमाणावर हवामान बदलाचे मोठे परिणाम पाहायला मिळणार आहेत.

२०१५ ते २०२३ ही नऊ वर्षे सर्वात उष्ण होती. या वर्षासाठी संस्थेचे निष्कर्ष ऑक्टोबर महिन्यापर्यतीचे असले तरी २०२३ हे विक्रमी उष्ण वर्ष होण्यापासून रोखण्यासाठी शेवटचे दोन महिने पुरेसे नाहीत . कार्बनचे प्रमाण कमी करण्यास मदत करण्याच्या दृष्टीने अक्षय ऊर्जा आणि अधिक इलेक्ट्रिक कारकडे वळणे यामुळे काही आशेचे संकेत आहेत, असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe