Ahmednagar News : नगर शहर व परिसरात बुधवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर गुरुवारी देखील शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते.
शुक्रवारी शहर व परिसरात मध्यम व विजेच्या कडकडट्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जून, जुलै ऑगस्ट महिने कोरडे गेल्यानंतर नोव्हेंबरच्या पंधरवड्यात शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती.
नगर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. कमी पावसामुळे खरीप हंगाम देखील वाया गेला होता.
त्यामुळे शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी शहर व जिल्ह्याच्या काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला.
गुरुवारी दिवसभर उकाडा होता, त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती.