Weather News : एल-निनो वादळाने अनेक नकारात्मक परिणाम निसर्गावर झाले. महत्वाचा म्हणजे याचा प्रभाव मान्सूनवर झाला. त्यामुळे यंदा पाऊस अत्यल्प झाला. थंडी देखील कमी झाली.
परंतु इतर देशांच्या तुलनेत एल-निनोचा परिणाम सर्वात जास्त भारतातवर होताना दिसत आहे. परंतु आता महत्वाची बातमी अशी आहे की, पुढील वर्षी २०२४ मध्ये याचा पुन्हा परिणाम दिसणार आहे.
एलनिनो पुन्हा एकदा मान्सूनपूर्व हंगामात जोरदारपणे सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
* ‘असे’ असेल २०२४ मध्ये हवामान अंदाज
२०२४ मध्ये एलनिनो वादळ मान्सूनपूर्व हंगामात जोरदारपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाला अडथळा होईल. उत्पादन मोठ्या प्रमाणात घटेल. २०२४ चा खरीप व रबी हंगाम २०२३ पेक्षाही अतिशय खडतर असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय महासागरीय द्वी-ध्रुविता एल-निनोला मारक ठरू शकली नाही. पावसासाठी धन आयओडी पूरक ठरत असतो. मात्र, तो डिसेंबरअखेर संपण्याच्या मार्गावर आहे. डिसेंबरची थंडी देखील आता जेमतेम राहण्याचा अंदाज आहे.
सध्या एल-निनो मध्यम तीव्रतेचा असल्याचे सांगण्यात आले असून जानेवारी, फेब्रुवारीत याची तीव्रता अधिक वाढणार आहे. त्यामुळे २ महिने थंडीवर परिणाम होईल. यामुळे उन्हाळी पिकांवर परिणाम होईल.
या दोन महिन्यात थंडी सरासरीइतकी वा त्यापेक्षा कमी असेल. फेब्रुवारी व मार्चमध्ये हंगामी गारपीट होण्याची शक्यताही वर्तवली आहे. २०२४ मध्ये उष्णता जास्त राहण्याचा अंदाज आहे.
* सद्य स्थितीत ‘मिचोंग’ चक्रिवादळचे संकट
बंगालच्या खाडीत ‘मिचोंग’ चक्रिवादळमुळे आंध्र प्रदेश व तमिळनाडूत आगामी काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा, पुद्दुचेरी, पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानुसार ‘मिचोंग’ ५ डिसेंबर रोजी आंध्रच्या किनाऱ्यावर धडकेल.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा करून चक्रिवादळापूर्वीच्या तयारीचा आढावा घेतला असल्याचे समजते. येथे चक्रीवादळ धडकल्यावर वाऱ्याचा वेग ताशी १०० किमी राहू शकतो.
चक्रीवादळामुळे तमिळनाडू सरकारने सोमवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. दक्षिण मध्य रेवेने ३ ते ७ डिसेंबरपर्यंत लांब पल्ल्याच्या ११८ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.