Weather forecast : महाराष्ट्रातील शेतकऱयांसाठी आनंदाची बातमी आहे कारण मान्सून सक्रिय झाला असून गुरुवारी मान्सूनने तेलंगणाचा काही भाग, आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग, ओडिशाचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा काही भाग,
पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात, तसेच झारखंड आणि बिहारच्या काही भागांत प्रगती केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असून दोन दिवसांत सक्रिय होत आहे. पुणे-मुंबईमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सून राज्यात दोन….
झारखंडच्या काही भागात प्रगती केली होती.
मान्सूनची सीमा रत्नागिरी, कर्नाटकमधील रायचूर, कावली, कॅनिंग, श्रीनिकेतन, डुमका भागात कायम होती. त्यानंतर मंगळवारी व बुधवारी मान्सून जागेवरच थांबला होता. त्यानंतर गुरुवारी काही भागात प्रगती केली आहे.
महाराष्ट्रात मात्र गुरुवारी मान्सूनने प्रगती केली नाही. महाराष्ट्रात मान्सूनची दिशा रत्नागिरी भागातच आहे. तर देशात मान्सूनची दिशा रायचूर, खम्मम, मल्कानगिरी, परलखेमुंडी, हल्दिया, बोकारो, पटना आणि रक्सौल भागात होती. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून दक्षिण द्वीपकल्पाचा काही भाग, महाराष्ट्राचा काही भाग, ओडिशाचा उर्वरित भाग, पश्चिम बंगालचा दक्षिण भाग, झारखंड आणि बिहारसह छत्तीसगडचा काही भाग व्यापण्याची शक्यता आहे.
तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून प्रगती करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात २३ ते २६ जूनदरम्यान हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा इशारा दिला आहे.
मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान अमरावतीमधे ३९.६ सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर १८ सेल्सिअस इतक नोंदवले गेले आहे.