Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. खानदेशातील काही भागांमध्ये पावसाने जोरदार दणका दिलाय. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कापूस सोयाबीन अशा सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. जास्तीच्या पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सर्वसामान्यांचे तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याने संबंधित भागात बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
खानदेश सारखीच परिस्थिती मराठवाड्यात सुद्धा दिसून येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुढील काही दिवस पावसाची अशीच स्थिती कायम राहू शकते.
दरम्यान आता आपण उद्या राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार याबाबत काय अंदाज समोर येतोय याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उद्या राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आहे. या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई
ठाणे
रायगड
रत्नागिरी
पालघर
पुणे
सातारा
सांगली
सोलापूर
कोल्हापूर
नाशिक
अहिल्यानगर
जळगाव
धुळे
नंदुरबार
संभाजीनगर
जालना
बीड
धाराशिव
लातूर
परभणी
हिंगोली
बुलढाणा
यवतमाळ
वाशिम
वर्धा
चंद्रपूर
गडचिरोली
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने आता शेतकरी संघटनांच्या माध्यमातून तसेच विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली पाहिजे. यासाठी फडणवीस सरकारकडे विविध संघटनांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
दरम्यान राज्याचे कृषिमंत्री मामा दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय याबाबत योग्य तो निर्णय घेतील असे आश्वासन दिले आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.