हवामान खात्याचा भीतीदायक अंदाज खरा झाला ! दिवाळीत पावसाची दमदार हजेरी, पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार

Havaman Andaj : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून महाराष्ट्रातून नुकताच गेलाय. साधारणता जून ते सप्टेंबर हा काळ मान्सून म्हणून ओळखला जातो. पण मान्सूनची एक्झिट झाल्यानंतरही महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे.

पावसाळा संपलाय पण पावसाचे सावट काही अजून गेलेले नाही. यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. दिवाळीच्या आनंदावर पावसाचे विरजण पडले असल्याने शेतकऱ्यांच्याही चिंतेत भर पडली आहे.

काढणीच्या अवस्थेत असणाऱ्या पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने ऐन दिवाळीत महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली होती.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील दिवाळीच्या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिला होता.

दरम्यान भारतीय हवामान खात्याचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.

आज दिवाळी पाडव्याच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातही दमदार पावसाने हजेरी लावली. अशा परिस्थितीत आता पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत.

दरम्यान हवामान खात्याने महाराष्ट्रात पुढील तीन-चार दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार असा अंदाज दिला आहे.

कोकण गोवा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडी कडून समोर आला आहे. आता आपण तारीखनिहाय कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार याबाबत माहिती पाहुयात.

आज या जिल्ह्यात पावसाची शक्यता

रत्नागिरी

सिंधुदुर्ग

सातारा

सांगली

कोल्हापूर

धाराशिव

लातूर

नांदेड

यवतमाळ

चंद्रपूर

गडचिरोली

बुलढाणा

23 ऑक्टोबरला या जिल्ह्यांसाठी पावसाचा येल्लो अलर्ट 

रायगड

रत्नागिरी

सिंधुदुर्ग

पुणे

सातारा

सांगली

कोल्हापूर

सोलापूर

धाराशिव

लातूर

बीड

नांदेड

वाशिम 

यवतमाळ

वर्धा 

चंद्रपूर 

गोंदिया

गडचिरोली 

24 ऑक्टोबरला कुठं पाऊस पडणार?

रायगड

रत्नागिरी

सिंधुदुर्ग 

कोल्हापूर

सांगली

सातारा

पुणे

 नगर

सोलापूर

बीड

धाराशिव

लातूर

नांदेड

वाशिम

बुलढाणा

अकोला

अमरावती

यवतमाळ 

वर्धा

नागपूर

चंद्रपूर 

गडचिरोली 

25 ऑक्टोबरला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार? 

रायगड

रत्नागिरी

पुणे

सातारा

सांगली

सोलापूर

अहिल्यानगर 

संभाजीनगर

बीड

धाराशिव