Maharashtra Havaman Andaj : गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात 17 तारखेपासून पावसाला सुरुवात झाली असून अनेक भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा सहित कोकण, विदर्भ, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील काही भागांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. काही ठिकाणी फक्त ढगाळ हवामान आणि अधून मधून हलक्या पावसाच्या सऱ्या पाहायला मिळताय. अशातच आता भारतीय हवामान खात्याने एक नवीन अंदाज जारी केला आहे.
या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर आता पुन्हा एकदा कमी होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
मात्र यानंतर राज्यातील काही भागांमधून पावसाचा जोर कमी होईल, अक्षरशा काही ठिकाणी पाऊस विश्रांती घेणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. आता आपण हवामान खात्याचा हा सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत.
22 ऑगस्ट : आज राज्यातील जवळपास 30 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आज महाराष्ट्रातील बहुतांशी भागात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे.
23 ऑगस्ट : उद्याही राज्यातील सर्वच विभागांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्या ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
24 ऑगस्ट : 24 तारखेला राज्यातील पावसाचा जोर थोडासा कमी होईल असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये म्हटले आहे. या दिवशी विदर्भ विभागातीलं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी आयएमडीचा येलो अलर्ट राहणार आहे. परंतु मराठवाड्यात या दिवशी पावसाची विश्रांती राहणार असे बोलले जात आहे.
25 ऑगस्ट : 25 ऑगस्ट ला विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. या दिवशी विदर्भात जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. या दिवशी कोकणातही पावसाचा जोर वाढेल असे म्हटले जात आहे. मध्य महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे. मराठवाड्यात मात्र पावसाची विश्रांती राहील असे आयएमडी कडून स्पष्ट करण्यात आले आहे.