बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस !

IMD ने मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. एक सप्टेंबर पर्यंत यासंबंधीत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain 2024

Maharashtra Rain 2024 : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. खरे तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप जोराचा पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे प्रमाण फारच अधिक होते. मात्र तदनंतर पावसाचा जोर कमी झाला.

जवळपास सात ते आठ दिवस पावसाने उघडीप दिली. यानंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन विदर्भमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची तीव्रता फारच कमी झाली आहे.

दरम्यान, आता भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याची माहिती दिली असून या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आजपासून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आय एम डी ने आजपासून एक सप्टेंबर पर्यंत राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढणार असे म्हटले आहे.

IMD ने मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. एक सप्टेंबर पर्यंत यासंबंधीत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे उद्या गुरुवारी आणि शुक्रवारी मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचे प्रमाण वाढेल असे आयएमडी चे म्हणणे आहे. हे दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 29 आणि 30 ऑगस्टला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्यात आज दिवसभर संततधार पावसाने हजेरी लावली.

मध्येच ऊन पडायचे आणि परत पावसाच्या सरी कोसळायच्या, असा खेळ पुणेकरांनां अनुभवायला मिळाला. विशेष बाब म्हणजे पुढील दोन-तीन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe