पाऊस आला रे…! अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह ‘त्या’ भागात 9 जूनपासून तीन दिवस पावसाची शक्यता

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शेतकऱ्यांसहित सामान्य जनता मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. मात्र हवामानात होत असलेल्या अमुलाग्र बदलामुळे मान्सूनचे आगमन यंदा चांगलेच लांबले आहे. सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होत असतो. गेल्यावर्षी तर मानसून 29 मे लाच केरळमध्ये आला होता.

तसेच मान्सून हा महाराष्ट्रात म्हणजेच तळ कोकणात सात जूनच्या सुमारास येतो. यंदा मात्र मान्सूनचे केरळमधील आगमन जवळपास आठ ते नऊ दिवस उशिराने होणार आहे. भारतीय हवामान विभागाने जवळपास 15 दिवसांपूर्वी केरळमध्ये मान्सून चार जूनला दाखल होणार असा अंदाज बांधला होता.

मात्र हवामान विभागाच्या या अंदाजाला मान्सूनने चकवा दिला आहे. चार जूनला मान्सूनचे केरळात आगमन झाले नाही पण पुढील 24 ते 48 तासात मान्सून केरळमध्ये पोहोचणार अशी माहिती आता हवामान विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे.

हे पण वाचा :- खुशखबर ! मान्सून येत्या काही तासात केरळमध्ये दाखल होणार, महाराष्ट्रात केव्हा? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

निश्चितच मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी गुड न्यूज राहणार आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून आधीच लांबला होता आणि त्यातच अरबी समुद्रात बिपरजॉय नावाचे चक्रीवादळ आलं.

यामुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळा आला आणि चार दिवस केरळमध्ये उशिराने दाखल होणारा मान्सून आता तब्बल आठ दिवस उशिराने केरळमध्ये दाखल होणार आहे.

देर आये दुरुस्त आये या उक्तीप्रमाणे उशिरा का होईना पण मान्सूनच आगमन थाटात व्हायला पाहिजे आणि मान्सून काळात चांगला समाधानकारक पाऊल बरसला पाहिजे अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून राज्यातील काही जिल्ह्यात 9 जून पासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान तज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आली रे…! केंद्र सरकारने खरीपासाठी हमीभाव जाहीर केला; सोयाबीन, तूर, कापूस कोणत्या पिकाला किती हमीभाव? वाचा….

पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ जून पासून ते 12 जून पर्यंत राज्यातील खानदेश, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई मध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, मुंबईसह कोकणात आणि जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी 9 जून पासून पुढील तीन दिवस अर्थातच 12 जून पर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय दरम्यानच्या काळात मराठवाडा आणि विदर्भात देखील ढगाळ हवामानासहीत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता तयार होत असल्याचे मत खुळे यांनी व्यक्त केले आहे.

एकंदरीत, मान्सूनची चाहूल लागली असून तत्पूर्वी पूर्व हंगामी पावसामुळे वातावरणात अल्हाददायक गारवा तयार होईल आणि यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच समाधान पाहायला मिळेल असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे.

हे पण वाचा :- बारावी पास विद्यार्थ्यांना सरकार देणार 50 हजाराची रक्कम, पहा कोणाला मिळणार पैसे?

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe