आज अन उद्या राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता !

आज विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम अन बुलढाणा या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मौसमी पावसा संदर्भात. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तर पावसाने सपशेल विश्रांती घेतली आहे.

अशातच भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील जवळपास 30 हुन अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाची विश्रांती राहणार असा अंदाज सार्वजनिक केला आहे. खरंतर ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला.

जुलैमध्येही राज्यात चांगला दमदार पाऊस झाला होता. काही ठिकाणी अक्षरशः पूरस्थिती तयार झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. कापूस सोयाबीन मूग डाळिंब यांसारख्या विविध पिकांना जास्तीच्या पावसाचा फटका बसला.

अनेक भागातील शेतकरी बांधव पाऊस कधी उघडेल याची वाट पाहत होते. आता गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. तथापि, भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम अन बुलढाणा या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित पाच जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच आज विदर्भातील उर्वरित जिल्हे, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण खानदेश, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई सह संपूर्ण कोकणात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.

मुंबई सह खानदेश, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची उघडीप राहणार आहे. आज राज्यातील तब्बल 31 जिल्हे कोरडे राहणार असा अंदाज आहेत. ज्या ठिकाणी सततचा पाऊस सुरू होता तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांना नवीन संजीवनी मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe