Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

Published on -

Maharashtra Rain : पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे.

त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, रविवारी सर्वात कमी तापमान यवतमाळ येथे १४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

राज्यात उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे थंडीचा पारा ११ अंशांपर्यंत घसरला होता. तसेच कोरड्या हवामानामुळे तापमान उतरले होते. मात्र सध्या काही भागांत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे.

त्यामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. राज्यात रविवारी सर्वात जास्त तापमान डहाणू येथे ३६. ४ अंश सेल्सिअस इतके होते. सध्या समुद्रसपाटीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे. याचदरम्यान मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे.

रविवारी पुणे येथे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतके होते. तर जळगाव १६.१, कोल्हापूर २३.९, महाबळेश्वर १७.७, नाशिक १५.५, सांगली २३.९, सातारा २२.५, सोलापूर २१, मुंबई २६, सांताक्रूझ २३.४, रत्नागिरी २४.४, डहाणू २२.९,

छत्रपती संभाजीनगर १५.२, परभणी १८, नांदेड १९, बीड १६.२, अकोला १६.६, अमरावती १८.५, बुलढाणा १७.४, ब्रह्मपुरी २०, चंद्रपूर १७.६, गोंदिया १६.५, नागपूर १६.२, वाशीम १७.२, वर्धा १७.६, तर यवतमाळ येथे १४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe