महाराष्ट्रातील ‘या’ 15 जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता !

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस झाला. तसेच काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने उसंत घेतली आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : मान्सूनचा अडीच महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे. आता मान्सूनचे फक्त दीड महिने बाकी आहेत. या अडीच महिन्याच्या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये चांगला समाधानकारक पाऊस झाला आहे. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जून मध्ये महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता.

जुलैमध्ये मात्र ही परिस्थिती पूर्णपणे पालटली. जुलैमध्ये राज्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहिले. जुलैमध्ये काही ठिकाणी पूरस्थिती तयार झाली होती.

यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस झाला. तसेच काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने उसंत घेतली आहे.

आता जवळपास आठ ते नऊ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने नुकतीच मोसमी पावसा संदर्भात मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने आज पासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार असे म्हटले आहे.

आज पासून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात देखील आगामी काही दिवस पाऊस पडणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात फक्त रिमझिम पावसाची शक्यता आहे. म्हणजे आगामी काही दिवस राज्यात कुठेच जोरदार पाऊस पडणार नाहीये. केवळ हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे.

IMD चा अंदाज काय आहे ?

आजपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबई सह संपूर्ण कोकणात म्हणजेच ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

विशेष बाब अशी की उत्तर महाराष्ट्रात देखील रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व पाच जिल्ह्यांमध्ये आगामी काही दिवस रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.

मराठवाड्याबाबत बोलायचं झालं तर धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा या विदर्भ विभागातील जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe