‘या’ जिल्ह्यांमध्ये पाच ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस ! रेड अलर्ट जारी, अहमदनगर जिल्ह्यात कस राहणार हवामान ? वाचा IMD चा नवीन अंदाज

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने उसंत घेतली. मात्र संपूर्ण जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला. जून आणि जुलै या दोन्ही महिन्यात महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस झाला. दरम्यान भारतीय हवामान खात्याने मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातही राज्यात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे.

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे या चालू ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात ऑगस्टमध्येही सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान भारतीय हवामान खात्याने 5 ऑगस्टपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल व लगतच्या दक्षिण बंगाल देशवरच्या CYCIR च्या प्रभावाखाली पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

यामुळे पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी येत्या 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

अहमदनगर मध्ये कस राहणार हवामान ?

आज दोन ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच जिल्ह्यात आज हलका पाऊस पडणार अशी शक्यता आहे. उद्या मात्र अहमदनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. पण पुन्हा एकदा चार आणि पाच तारखेला जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. हे दोन दिवस जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 

कुठं बरसणार मुसळधार पाऊस 

आज कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

उर्वरित राज्यात मात्र हलक्या पावसाची शक्यता आहे. उद्या तीन ऑगस्टला सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण कोकण, पुणे आणि नाशिकला ऑरेंज कलर देण्यात आला आहे. सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

4 ऑगस्ट ला सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट राहणार आहे. रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आणि मुंबईसह उर्वरित कोकणाला येलो अलर्ट राहणार आहे. संपूर्ण खानदेश, नाशिक, पुणे आणि कोल्हापूरला सुद्धा यलो अलर्ट राहणार आहे.

पण, उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्‍यता आहे. पाच ऑगस्टला कुठेच रेड अलर्ट राहणार नाही मात्र सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट राहणार आहे. तसेच रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट राहणार आहे. उर्वरित राज्यात मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe