30 ऑगस्टपासून ते 2 सप्टेंबर पर्यंत कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार ?

भारतीय हवामान खात्याने 30 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबर पर्यंत अर्थातच बैलपोळ्यापर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरे तर गेली काही दिवस महाराष्ट्रात पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. पण आज पासून पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढणार असा अंदाज आहे.

Published on -

Maharashtra Rain : सहा दशकानंतर प्रथमच अरबी समुद्रात पावसाळी काळात चक्रीवादळ तयार होणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या आधी एप्रिल-मे महिन्यात आणि पाऊस माघारी गेल्यानंतर अर्थातच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात चक्रीवादळ तयार होतात. आपण या काळाला चक्रीवादळाचा काळ असे म्हणून शकतो.

विशेष म्हणजे गेली सहा दशक अर्थातच साठ वर्ष हा जो पॅटर्न आहे तो बदललेला नाही. पण यंदा 60 वर्षांनी प्रथमच हा पॅटर्न बदलणार आहे. सहसा पावसाळ्यात चक्रीवादळे तयार होत नाहीत, पण यंदा ऐन पावसाळ्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होणार आहे. सध्या कच्छ, सौराष्ट्रवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून हे कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असून आज या दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे.

परिणामी ईशान्य अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे या चक्रीवादळाचा भारतावर काय परिणाम होणार? असा यक्षप्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी हे चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकत असल्याने भारतीय किनारपट्टीला या चक्रीवादळाचा कुठलाच धोका नसल्याचे अधोरेखित केले आहे.

पण याचा प्रभाव गुजरात मध्ये पाहायला मिळू शकतो. तेथील सौराष्ट्र, कच्छ येथील काही भागांत मध्यम ते अतिमुसळधार पावसाची, तसेच ४५ ते ६५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावर कोणताच परिणाम होणार नाही.

पण भारतीय हवामान खात्याने 30 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबर पर्यंत अर्थातच बैलपोळ्यापर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरे तर गेली काही दिवस महाराष्ट्रात पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. पण आज पासून पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढणार असा अंदाज आहे.

कुठं बरसणार पाऊस?

30 ऑगस्ट 2024 : आज विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.

31 ऑगस्ट : उद्या मराठवाड्यातील सर्वच्या सर्व 8 जिल्ह्यामध्ये, विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आणि बाकी सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

1 सप्टेंबर : मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये, विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

2 सप्टेंबर : बैलपोळ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. या दिवशी हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. आयएमडीने सांगितल्याप्रमाणे कोकणातील मुंबई, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार हे जिल्हे वगळता बैलपोळ्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा अन कोल्हापूर, कोकणातील रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

बाकी सर्व जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना आणि विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव अन अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली अन सोलापूर, कोकणातील ठाणे, रत्नागिरी अन सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe