महाराष्ट्रात आता ‘इतके’ दिवस पाऊस पडणार नाही, पण ‘या’ तारखेपासून पुन्हा धो-धो, हवामान खात्याचा अंदाज बघायलाच हवा

आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरावर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल आणि या पार्श्वभूमीवर आयएमडीने या संबंधित जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आता निवळला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाला होता. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला.

सात सप्टेंबर पासून राज्यात पाऊस सक्रिय झाला होता आणि जवळपास 10 सप्टेंबर पर्यंत राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पाऊस झाला होता. मात्र आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर फारच कमी झाला आहे.

राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सध्या फक्त ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. तर काही भागांमध्ये फक्त ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.

दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरावर आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

परंतु उद्यापासून राज्यात सर्व दूर पावसाची उघडीप राहणार आहे. उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात सर्व दूर पावसाची उघडीप राहणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे.

आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरावर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल आणि या पार्श्वभूमीवर आयएमडीने या संबंधित जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

पण शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे. या काळात राज्यातील कोणत्याचं जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार नाही असा अंदाज आहे. त्यामुळे हे तीन दिवस महाराष्ट्रातील कोणत्याचं जिल्ह्यासाठी अलर्ट देण्यात आलेला नाही.

पण रविवार नंतर महाराष्ट्रातील परिस्थिती पुन्हा एकदा बदलणार आहे. भारतीय हवामान खात्याने सोमवारपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोमवारपासून विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.

हवामान खात्याने गोंदिया आणि अकोला हे दोन जिल्हे वगळता विदर्भातील सर्वच्या सर्व नऊ जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

या अनुषंगाने या दहा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र स्थानिक वातावरण तयार होईल आणि स्थानिक वातावरणानुसार पाऊस पडेल असेही आयएमडीने स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe