महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस पाऊस पडणार ? पंजाबरावांची मोठी भविष्यवाणी

Published on -

Maharashtra Rain News : भारतीय हवामान खात्याने 29 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा विभागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पण फक्त विदर्भातच 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान पाऊस राहणार आहे.

तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 29 मार्च आणि 30 मार्च हे दोनच दिवस पावसाचे राहणार असे हवामान खात्याने यावेळी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे हवामान खात्यासोबतच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट राहणार असा अंदाज यावेळी वर्तवला आहे.

एवढेच नाही तर एप्रिल महिन्यातही अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. यामुळे पंजाबरावांचा सविस्तर हवामान अंदाज आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय म्हणालेत पंजाबराव

खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये दिवसाचे कमाल तापमान हे विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. राज्यातील विदर्भ विभागातील अकोला शहरात कमाल तापमान हे 42.8°c पर्यंत पोहोचले. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मध्ये तापमान 42, उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव मध्ये सुद्धा तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.

मराठवाड्यात देखील कमाल तापमानाने आतापर्यंतचे सारे विक्रम मोडले आहेत. अशातच मात्र राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. आज सकाळी उत्तर महाराष्ट्रातील मालेगावमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला.

या पावसामुळे मालेगाव शहरातील नागरिकांना काही काळ गारवा अनुभवायला मिळाला.तथापि पाऊस उघडल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील उकाडा वाढला आणि यामुळे नागरिक पुन्हा कामावरून झालेत. उकाड्याने नागरिक अक्षरशा हैराण परेशान झाले आहेत.

विशेष म्हणजे 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे परंतु तरीही महाराष्ट्रात उष्णता देखील खूपच अधिक राहणार आहे. म्हणजेच पाऊस तर पडणारच आहे, पण उकाडा देखील नागरिकांना जाणवणार आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्चला अवकाळी पावसाची शक्यता आहे.

राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागात पंजाब रावांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

परंतु पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात इतर भागाच्या तुलनेत पावसाची तीव्रता आणि प्रमाण थोडेसे अधिक राहणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात 31 मार्चनंतर हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. पण, 6 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिलला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होईल असे देखील यावेळी पंजाबरावांनी म्हटले आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी पाच एप्रिल पर्यंत आपली संपूर्ण शेतीची कामे करून घेणे आवश्यक राहणार आहे कारण की, एप्रिल महिन्यातल्या संभाव्य पावसाची तीव्रता अधिक राहणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe