Maharashtra Rain Panjabrao Dakh : मान्सूनचा पहिला महिना अर्थातच जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. राज्यातील काही भाग वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली होती. म्हणून अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे. राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर गेल्या महिन्यात चांगला जोरदार पाऊस झाला मात्र उर्वरित महाराष्ट्रात अजूनही मुसळधार पाऊस झालेला नाही.
यामुळे शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा लागल्या आहेत. दरम्यान जुलै महिन्याला सुरुवात झाली असून जुलै महिन्यात महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय.
दरम्यान याच संदर्भात परभणी येथील ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाबरावांनी उद्यापासून अर्थात चार जुलैपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार असे भाकीत वर्तवले आहे.
अशा परिस्थितीत आज आपण पंजाबरावांनी वर्तवलेल्या या सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाची परिस्थिती कशी राहणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
काय म्हटले पंजाबराव
पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्रात उद्यापासून अर्थात चार जुलै पासून ते 10 जुलै पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये छोटे-मोठे तळे भरून वाहतील असा पाऊस पडणार आहे. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येण्याची देखील शक्यता आहे.
एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या जोरदार पावसाची प्रतीक्षा पाहिली जात आहे तो जोरदार पाऊस आता लवकरचं सुरू होईल अशी आशा आहे. पंजाबराव म्हणतात की ज्या वर्षी पूर्वेकडून महाराष्ट्रात पाऊस दाखल होतो त्यावर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस बरसत असतो.
जेव्हा पूर्वेकडून पाऊस येतो त्यावेळी अहमदनगर, सोलापूर, बीड, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा सहित संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत असतो.
यंदा देखील महाराष्ट्रात पूर्वेकडूनच पाऊस आला आहे अन यामुळे याही वर्षी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये चांगला समाधानकारक पाऊस राहणार अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात यंदा मान्सून काळात चांगला पाऊस पडणार असे पंजाबरावांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
जुलैमध्ये देखील यावर्षी चांगला पाऊस राहणार असून उद्यापासून ते दहा जुलै पर्यंत म्हणजेच सहा ते सात दिवसांच्या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. आता पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज समोर आला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळाले आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेती कामांना वेग येणार आहे.