Monsoon 2024 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी हवामान खात्यातील काही तज्ञांनी यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार असे भाकित वर्तवले होते. याचा परिणाम म्हणून या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुद्धा जोरदार पाऊस होईल असे बोलले जात होते. अशातच मात्र मानसून 2024 संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हवामान खात्यातील काही तज्ञांनी ला-निना च्या प्रभावामुळे यंदा सप्टेंबरसह ऑक्टाेबरमध्येही जाेरदार पाऊस हाेईल अन मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होणार असा अंदाज व्यक्त केला होता.
पण, आता हवामान खात्याचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी यंदाही मान्सूनचा परतीचा प्रवास वेळेतच सुरू होणार असे म्हटले आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होईल या अंदाजाला सध्यातरी काेणताही आधार नसल्याने मान्सून ऑक्टाेबरच्या पहिल्या पंधरवाड्यात आपल्या नियाेजित वेळी महाराष्ट्रातून निघून जाईल असा दावा खुळे यांनी यावेळी केला आहे.
खरे तर दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर म्हणजेच 15 ऑक्टोबरच्या आसपास मोसमी पाऊस म्हणजेच नैऋत्य मोसमी वारे भारतातून निघून जातात.
जेव्हा नैऋत्य मोसमी वारे भारतातून निघून जातात त्यावेळी दक्षिण भारतातील चार राज्यांमध्ये ईशान्य पाऊस किंवा हिवाळी पाऊस सूरु होतो. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रातून मान्सून परतीचा प्रवास सुरू करत असतो.
साधारणतः 15 ऑक्टोबर पर्यंत मान्सून महाराष्ट्रातून निघून जातो. यंदाही अशीच प्रक्रिया कायम राहील? नियोजित वेळेत मान्सून महाराष्ट्रासहित देशातून माघारी फिरेल असे बोलले जात आहे.
एकंदरीत काही हवामान तज्ञांनी ला निनाच्या प्रभावामुळे यावर्षी सप्टेंबर मध्ये जोरदार पाऊस होईल आणि याचा प्रभाव ऑक्टोबर मध्येही पाहायला मिळेल आणि ऑक्टोबर मध्ये ही मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच तज्ञांनी मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा लाभणार असे म्हटले आहे. मात्र या गोष्टीला सध्या तरी कोणतीच हवामान प्रणाली आधार देत नसल्याचे माणिकराव खुळे यांचे म्हणणे आहे.
तथापि, मान्सूनच्या परतीच्या प्रवासा संदर्भात एक ऑक्टोबर नंतरच योग्य तो अंदाज जारी करता येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यामुळे यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार का? हे पाहण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.