जाता-जाता मान्सूनचं विक्राळ रुप दिसणार…! ‘या’ राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार, वाचा सविस्तर

हवामान खात्यानुसार, उत्तराखंड, छत्तीसगड, बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या सर्व राज्यांमध्ये सात सेमी (70 मिमी) पेक्षा जास्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Tejas B Shelar
Published:
Monsoon 2024

Monsoon 2024 : गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. पण राज्यातील विदर्भ विभागात उद्यापासून पावसाला सुरवात होईल अन उर्वरित भागात 20 पासून पुन्हा पाऊस हजेरी लावेल असे म्हटले जात आहे. अशातच हवामान खात्याने मान्सून बाबत मोठी अपडेट दिली आहे.

IMD नुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा अधिक तीव्र होऊन वादळी प्रणाली तयार झाली. यामुळे मुसळधार पाऊस होणार अन पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे.

बांकुरा, पुरुलिया आणि पश्चिम मेदिनीपूरमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात समुद्रातील वारा 70 किमी/तास वेगाने वाहू शकतो. हवामान तज्ज्ञांच्या मते हे वादळ हळूहळू दिल्लीच्या दिशेने सरकू शकते.

उत्तर प्रदेश आणि बिहार मार्गे दिल्ली अशा या वादळाची दिशा असेल. तथापि, पुढील 48 तासांत ते खोल उदासीनतेपासून नैराश्यापर्यंत कमी होईल, असेही सांगितले जात आहे.

हवामान खात्यानुसार, उत्तराखंड, छत्तीसगड, बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या सर्व राज्यांमध्ये सात सेमी (70 मिमी) पेक्षा जास्त मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील काही दिवस उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकंदरीत मान्सून जाता-जाता चांगलाच दमदार बरसणार असे भासत आहे.

राज्यात मात्र पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. पण यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार अन ऑक्टोबरमध्येही पाऊस पडणार अशी शक्यता आहे. यामुळे आगामी काळात राज्यात चांगला पाऊस होईल असे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe