शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! मान्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम लांबला, कधी घेणार एक्सिट ?

Published on -

Monsoon News : गत काही दिवसांपासून महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी उपस्थित होत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व खानदेशात काही ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस झालाय. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकट आणि पुन्हा एकदा हिरावला गेला आहे. यामुळे राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अशी मागणी विरोधकांकडून उपस्थित केली जात आहे.

शेतकरी संघटना देखील या प्रमुख मागणीसाठी आग्रही आहेत. दरम्यान फडणवीस सरकारने राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकतीच मदत जाहीर केली आहे.

पण सरकारकडून दिली जाणारी नुकसान भरपाई फारच तुटपुंजी आहे असे म्हणत विरोधकांनी सरकारला घेरले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीच्या आधी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण मदत दिली जाईल असे म्हटले आहे.

अशातच आता मान्सून संदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मान्सून आपल्या शेवटच्या टप्प्यात प्रचंड हाहाकार माजवत असतानाच आता याचा मुक्काम सुद्धा लांबला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातला मान्सूनचा मुक्काम लांबला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही अशी माहिती दिली जात आहे.

तसेच आजउद्या वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. 26 – 27 तारखेला सुद्धा असेच वातावरण राहील. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 सप्टेंबरलाही पावसाचा जोर कायम राहणार आहे.

अर्थात आज पासून पुढील पाच-सहा दिवस राज्यात असेच हवामान कायम राहणार आहे. आता हा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांना कामांचे योग्य ते नियोजन करावे लागणार आहे.

पण पंजाबराव डख यांनी एक ऑक्टोबरपासून हवामान कोरडे होणार असा अंदाज दिला आहे. ऑक्टोबरचे पहिले दहा दिवस महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नाही असा त्यांचा अंदाज आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News