Monsoon News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून 2025 संदर्भात. खरेतर, गत दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने विश्रांती घेतली आहे. मान्सून आता अंतिम टप्प्यात आला असतांना पावसाने विश्रांती घेतली असल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे संबंधित भागातील शेतकरी बांधव पावसाची वाट पाहत आहेत. अशातच आता परतीचा मान्सून कधी सुरू होणार? याबाबत मोठे अपडेट समोर आल आहे.

पुढील दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. कोकणात व विदर्भात हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला आहे. पण परतीचा पाऊस सुरू झाला की पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
यावर्षी परतीचा मान्सून 16 – 18 सप्टेंबर दरम्यान सुरू होणार असल्याचा मोठा अंदाज समोर आला आहे. यावर्षी मान्सून मधील अनियमितता शेतकऱ्यांसाठी विशेष नुकसानदायक ठरली आहे.
यांना मान्सून सुरू होण्या आधीच म्हणजेच मे महिन्यात महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला होता. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकला होता.
हा मान्सून पूर्व पाऊस मान्सूनवर परिणाम करणार नाही ना असा सवाल तेव्हाही शेतकरी उपस्थित करत होते. दरम्यान यंदा वेळेआधीच मान्सून सक्रिय झाला. पण गेल्या तीन महिन्यात कित्येकदा पावसाचा खंड पडला आहे.
मान्सून काळात यंदा पावसाचा खंड अगदीच जून महिन्यापासून पाहायला मिळाला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात सुद्धा सुरुवातीचे काही दिवस पाऊस गायब होता. मात्र त्यानंतर पावसाची तीव्रता वाढली. मग राज्यभर मुसळधार पाऊस झाला.
सप्टेंबर महिन्यात मात्र ऑगस्ट महिन्यासारखा जोरदार पाऊस झालेला नाही. विशेष म्हणजे गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात सगळीकडेच पाऊस गायब आहे. अशातच आज विदर्भ, कोकणातील काही भागात पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे.
16 तारखेपासून परतीचा मान्सून सक्रिय होईल. ज्या भागात मान्सून काळात अपेक्षित पाऊस झालेला नाही त्या भागातील शेतकऱ्यांची सर्व मदार परतीच्या मान्सून वरच आहे.