Monsoon News : महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसह देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णता एवढी मोठ्या प्रमाणात वाढली आहे की नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल बनले आहे. देशातील काही शहरांमध्ये कमाल तापमान 50 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. सर्वाधिक तापमान राजस्थान मध्ये नमूद केले जात आहे.
गुजरात मध्ये देखील तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही शहरांमध्ये कमाल तापमान हे 46° च्या जवळपास गेले आहे.
त्यामुळे राज्यातील जनता उकाड्याने हैराण झाली असून मान्सूनचे आगमन कधी होणार हा मोठा सवाल विचारला जात आहे. अशातच आता मान्सून संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. मान्सूनचे राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात कधी आगमन होणार या संदर्भात भारतीय हवामान खात्याने मोठी गुड न्यूज दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही तासात मान्सूनचे भारताच्या मुख्य भूमीत म्हणजेच केरळमध्ये आगमन होणार हे स्पष्ट होत आहे. यामुळे उन्हाच्या चटक्याने भाजून निघालेल्या काळ्या आईला लवकरच मोसमी पाऊस शितलता प्रदान करणार आहे. मान्सून आगमनामुळे संपूर्ण देशातील जनतेला दिलासा मिळणार आहे.
मौसमी पावसाला सुरुवात झाल्यानंतर तापमानात देखील घट येणार आहे. आज अर्थातच 29 मे 2024 ला हवामान खात्याने मान्सून बाबतचा आपला नवीन अंदाज जारी केला आहे. यामध्ये हवामान खात्याने असे म्हटले आहे की, मान्सून केरळकडे सरकत आहे, जो आतापर्यंत मालदीवच्या आसपास होता.
नंतर मग तो उत्तर-पूर्व राज्यांकडे सरकणार आहे. केरळमध्ये येत्या काही तासात मान्सूनचे आगमन होणार आहे यानंतर दहा ते अकरा जूनच्या सुमारास कोकणसहित मुंबईत मान्सून दाखल होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
यानंतर मग 15 जूनच्या सुमारास मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार अशी माहिती हवामान खात्याच्या तज्ज्ञांचा माध्यमातून समोर येत आहे. आय एम डी ने यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार असून या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे.