Monsoon News : अखेर भारतातील मान्सूनचा हंगाम संपला! पाऊस किती पडला ? वाचा थोडक्यात

Ahmednagarlive24 office
Published:
Monsoon News

Monsoon News : यंदाचा मान्सूनचा हंगाम संपल्याचे शनिवारी हवामान खात्याने जाहीर केले. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या हंगामात यंदा सामान्य पाऊस पडला. अल निनोचा मान्सूनवर परिणाम झाला असला तरी त्याचा मोठा फटका बसला नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) ९६ ते १०६ टक्क्यांदरम्यानचा पाऊस पडला तर तो सामान्य मानला जातो. यंदा ९४.४ टक्के म्हणजे सामान्य पाऊस पडल्याचे हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले..

हवामान खात्याच्या ३६ उपविभागांपैकी २६ उपविभागांमध्ये सामान्य पाऊस पडला. या २६ उपविभागांमध्ये देशाचा ७३ टक्के भूभाग येतो. ९ टक्के भूभाग असलेल्या तीन उपविभागांमध्ये अतिवृष्टी, तर १८ टक्के भूभाग असलेल्या सात उपविभागांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस झाल्याची माहिती मृत्युंजय यांनी दिली.

संपूर्ण देशात सरासरी ८६८.६ मिलीमीटर पाऊस पडला, तर तो सामान्य मानला जातो. यंदा ८२० मिमी पाऊस पडला. जून महिन्यात एलपीएच्या ९१ टक्के, जुलै महिन्यात ११३ टक्के, ऑगस्टमध्ये ६४ टक्के, तर सप्टेंबरमध्ये ११३ टक्के पाऊस झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe