मान्सून वेळेपूर्वी होणार दाखल; हवामान विभाग म्हणते, ‘या’ दिवसापासून सुरु होणार महाराष्ट्रात पावसाळा

Published on -

देशातील वातावरणात सध्या चांगलाच बदल झाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट असल्याचे जाणवत आहे, तर काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडत असल्याचे दिसत आहे. या संमिश्र वातावरणात नेमकं मान्सूनच आगमन कधी होणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. एप्रिल हीटच्या स्थितीमुळं यावर्षी पावसाचं गणित बदलणार असल्याची माहिती, हवामान तज्ज्ञांनी दिली. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ते 20 मे रोजी मान्सून अंदमानच्या सागरात येण्याची शक्यता आहे. त्यानुसार 30 मे ते 1 जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

पाऊस लवकर येणार

यापूर्वीचा इतिहास पाहिला तर साधारणः 21 मेपर्यंत मान्सून अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरमध्ये पोहोचतो. त्यापूर्वी तो दक्षिण अंदमानमध्ये दाखल होतो. त्यानंतर 1 जूनपर्यंत तो केरळमध्ये येतो. मात्र यावेळी तो जरा लवकरच दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी देशभरात मोठ्या प्रमाणात उष्णता होती. 50 दिवसांपेक्षा जास्त दिवस यावर्षी उष्णतेची लाट सक्रिय होती. त्यामुळं हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापल्यानं बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळं देशभरात बाष्पयुक्त डघ तयार झाले आहेत. परिणामी यंदा लवकर मान्सून येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

यावर्षी लवकर मान्सून दाखल होणार असल्याने पाणीपातळीत लवकर वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या अनेक भागात पाण्याची बिकट अवस्था आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळं शेतीसाठी, पिण्यासाठी जनावऱ्यांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. असा स्थितीत जर मान्सून लवकर दाखल झाला तर शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

पुढील काही दिवस धोक्याचे

गेल्या 24 तासांमध्ये देशातील हवामानात बदल झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आला आहे. अजूनही ढगाळ हवामान असल्यामुळे उष्णता देखील कमी झाली आहे. हवामान विभागानं पुढील 4 ते 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा कायम आहे. राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe